Parambir Singh | परमबीर सिंह यांनी भरला 50 हजाराचा दंड, जाणून घ्या प्रकरण

मुंबई : पोलीसनामा आँनलाइन – Parambir Singh | माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर 100 कोटी रुपयाच्या खंडणीचे आरोप करणारे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) यांनी चांदीवाल आयोगासमोर (Chandiwal Commission) प्रतिज्ञापत्रं सादर न केल्याने त्यांना 50 हजाराचा दंड ठोठावण्यात आला होता. यावरुन अखेर त्यांना सुनावण्यात आलेल्या पन्नास हजाराचा दंड भरला आहे. हा निधी त्यांना मुख्यमंत्री कोव्हिड निधीत (CM Covid Nidhi) जमा करण्याचे आदेश देण्यात आले होते. यावरुन हा निधी सिंह यांनी जमा केलाय.

Ration Card Rules | आता दुकानात न जाता तुम्हाला तुमच्या हक्काचे धान्य मिळणार; रेशन कार्डाच्या नियमांत बदल

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) यांना चांदीवाल आयोगाने (Chandiwal Commission) 3 वेळा दंड ठोठावला होता. यापुर्वी परमबीर सिंह यांना 5000 रुपये. नंतर 25 हजार रुपये आणि नंतर 50 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. त्यानुसार परमबीर सिंग यांनी अखेर ही रक्कम जमा केली आहे. या दरम्यान, परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपानंतर चौकशीसाठी राज्य सरकारकडून न्या. चांदिवाल आयोगाची स्थापना केली गेली. आयोगाला दिवाणी न्यायालयीन अधिकार बहाल करण्यात आले आहेत. याबाबत सचिन वाझेचा (Sachin Vaze) जबाब नोंदवला आहे. आयोगाने समन्स बजावून सचिन वाझेला हजर राहण्याचे आदेश दिले होते. न्या. चांदीवाल यांनी स्वतः सचिन वाझेचा जबाब नोंदवला. परंतु, परमबीर सिंह यांनी आयोगाकडे प्रतिज्ञापत्रं सादर केलं नव्हतं. यावरुन सिंह यांना दंड ठोठावला होता.

दरम्यान, चांदिवाल समितीस चौकशी आयोग अधिनियम 1952 मधील कलम 4,5 अ, 8,9 नुसार दिवाणी आणि अनुषंगिक अधिकार प्राप्त झाले आहेत. परमबीर सिंह (Parambir Singh) यांनी देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांमध्ये तथ्य आढळल्यास ही समिती याप्रकरणाचा तपास आणि अन्य संस्थांकडे सोपवण्याची शिफारस करु शकते. या समितीला अलीकडेच कार्यालयासाठी जागा देण्यात आली. 6 महिन्यात चांदिवाल समितीकडून चौकशीला अहवाल (Report) सादर केला जाईल.

हे देखील वाचा

Dhananjay Munde | ‘आधी पाया पक्का करावा लागतो; धनंजय मुंडेंचा खा. प्रीतम मुंडेंना खोचक टोला

Ration Card Rules | आता दुकानात न जाता तुम्हाला तुमच्या हक्काचे धान्य मिळणार; रेशन कार्डाच्या नियमांत बदल

Modi Government | जर घरबसल्या दरमहिना पाहिजेत 5000 रुपये, तर ‘इथं’ करा गुंतवणूक; जाणून घ्या मोदी सरकारची योजना

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : param bir singh puts rs 50000 in cms fund

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update