Parambir Singh | परमबीर सिंह बेपत्ता, CID कडून शोध सुरु, नेपाळमार्गे लंडनला पळाले?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh) सध्या चौकशी आयोगासमोर हजर राहत नाहीत, शिवाय ते चंदीगड (Chandigarh) आणि मुंबईतील (Mumbai) निवासस्थानीही नसल्याने परमबीर सिंह (Parambir Singh) परदेशात (abroad) पसार झाले आहेत. ते नेपाळमार्गे लंडनला (London via Nepal) गेले असल्याचे सांगितले जातेय. मात्र, त्याबाबत अधिकृत काहीही माहिती उपलब्ध नसल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

काही महिन्यांपासून बेपत्ता असलेले वादग्रस्त आयपीएस अधिकारी व मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह बेपत्ता झाले आहेत. राज्य गुप्त वार्ता विभागाकडून (CID) त्यांचा शोध सुरु असून एक पथक त्यांच्या मूळगावी चंदीगड येथे ठिय्या मारुन आहे. परमबीर सिंह यांना न्या. चांदीवाल आयोगाने (Justice Chandiwal Commission) अजामीनपात्र वॉरंट (Non-bailable warrant issued) बजावले असून, हे देण्यासाठी पथक तिकडे गेले. मात्र, ते नमूद पत्त्यावर आढळले नसल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

परमबीर यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप (Allegations of corruption) केले होते. त्यानंतर त्यांच्याही भ्रष्टचाराची अनेक प्रकरणे चव्हाट्यावर येऊन खंडणीचे (ransom) गुन्हे दाखल झाले. त्यामुळे 30 एप्रिलपासून ते रजेवर चंदीगडला गेल्यावर अद्याप परतलेले नाहीत. यापूर्वी आठ दिवसांची रजा घेतल्यानंतर त्यांनी सतत आजारी असल्याचे प्रमाणपत्र पाठवून ‘मेडिकल लिव्ह’ (Medical leave) वाढवली.15 दिवसांपासून त्यांनी त्याबाबत गृहविभागाशी पत्रव्यवहार केला नसल्याचे समजते.

दोन्ही मोबाईल स्वीच ऑफ ?

परमबीर यांचे दोन्ही मोबाईल पाच महिन्यांपासून स्वीच ऑफ (Mobile switch off) आहेत.
त्यामुळे त्यांच्यावर ‘लूक आऊट’ नोटीस (Look out notice) जारी केली असली, तरी त्यापूर्वीच ते परदेशात गेल्याची चर्चा आहे.
ते नेपाळमार्गे लंडनला गेले असल्याचे सांगितले जाते. ठाणे पोलिसांनी दीड महिन्यापूर्वी परमबीर सिंह यांच्याविरुद्ध ‘लूक आऊट’ नोटीस जारी केली आहे.

हे देखील वाचा

Pitru Paksha 2021 | उद्यापासून श्राद्धपक्ष सुरू होईल, 16 दिवसापर्यंत चुकूनही करू नका ‘ही’ कामे; जाणून घ्या

Punjab New CM | …म्हणून अंबिका सोनींनी नाकारली सोनिया गांधींकडून आलेली पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची ‘ऑफर’

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Parambir Singh | parambir singh missing search launched cid possibility fleeing london nepal

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update