Paramvir Singh | पोलिस उपअधीक्षक निपुंगेंचा परमबीर सिंग यांच्यावर आरोप, म्हणाले – ‘महिला पोलिसाच्या खुनाच्या गुन्हयात मुंबईच्या माजी पोलिस आयुक्तांनीच अडकवलं’

नाशिक (Nashik) : माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Paramvir Singh) यांच्याविरोधात तक्रारी वाढत चालल्या आहे. अनेक पोलीस अधिकऱ्यांनी आता त्यांच्या कार्यकाळात झालेले गैरव्यवहार समोर आणण्यात येत आहे. इतकेच नाही तर ज्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना सिंग यांनी त्रास, खोट्या गुन्ह्यात अडकवले होते त्यांनी तक्रारी देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे सिंग यांच्या अडचणी वाढल्या आहेत. दरम्यान नाशिकच्या आडगाव पोलीस ठाण्यात आणखी एक तक्रार परमबीर सिंग (Paramvir Singh) यांच्याविरोधात दाखल झाली आहे. पोलीस उपअधीक्षक श्यामकुमार निपुंगे (Deputy Superintendent of Police Shyam Kumar Nipunge) यांनी हि फिर्याद दिली असून वाहतूक विभागातील गैरव्यवहार प्रकरणाचा (Department of Transportation Abuse Case) पर्दाफाश केल्यामुळे दुखावलेले तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनीच मला सुभद्रा पवार (Subhadra Pawar) या पोलीस कर्मचाऱ्याच्या मृत्यू प्रकरणात अडकविल्याचा आरोप निपुंगे यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे.

१४ जूनला दिलेल्या फिर्यादीत निपुंगे यांनी असे म्हंटले आहे की, परमबीर सिंग हे ज्यावेळी ठाण्यात कार्यरत होते त्यावेळी २०१७ मध्ये निपुंगे यांच्या कार्यालयातील सुभद्रा पवार या महिला पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्या केली. पवार यांनी निपुंगे यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची तक्रार नोंदवली होती. तपासात सुभद्रा पवार हिची हत्या तिचा प्रियकर अमोल फफाळे (Amol Fafale) याने केली हे उघड झाले. माझा थेट संबंध सुभद्रा हत्या प्रकरणात (Subhadra murder case) नसतानाही मला यात सिंग यांनी गोवल्याचे त्यांनी सांगितले.

श्यामकुमार निपुंगे यांनी तत्कालीन आयुक्त परमबीर सिंग यांच्यासह पोलीस आयुक्त मधुकर पांडे,
पोलीस उपायुक्त डॉ. डी. एस. स्वामी, सहायक आयुक्त रमेश धुमाळ, तत्कालीन वरिष्ठ पोलीस
निरीक्षक मुक्तार अली बागवान, अमोल फफाळे यांच्याविरोधात अ‍ॅस्ट्रॉसिटीसह कट रचणे व इतर
कलमांनुसार आडगाव पोलीस ठाण्यात २२ पानी तक्रार केली आहे.

हे देखील वाचा

Nitesh Rane | तालिका अध्यक्षाच्या खुर्चीचा अपमान या सोंगाड्याने केला, नितेश राणेंची भास्कर जाधव यांच्यावर जहरी टीका

Atul Bhatkhalkar | ‘वसूली सरकारने या घाणेरड्या खेळाची सुरुवात केली शेवट आम्ही करू’ (व्हिडीओ)

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Paramvir Singh | murder female police officer deputy superintendent police nipunge alleges paramvir singh

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update