Parbhani Accident News | दुर्दैवी ! रुग्णालयात जाताना आजोबा आणि नातवाचा भरधाव बसच्या टायरखाली चिरडून मृत्यू

परभणी : पोलीसनामा ऑनलाईन – Parbhani Accident News | परभणीमध्ये रुग्णालयामध्ये उपचार घेण्यासाठी दुचाकीवरून जात असताना दुचाकी भरधाव बसच्या टायरखाली आल्याने आजोबा आणि नातवाला आपला जीव गमवावा लागला आहे. ही घटना गंगाखेड नांदेड महामार्गावरील मालेवाडी पाटीजवळ घडली आहे. श्रीनिवास कल्याणराव शिंदे (वय 19 वर्षे) असे नातवाचे तर शिवाजी शिंदे (वय 75 वर्ष) असे आजोबाचे नाव आहे. हे दोघेही रावराजुर तालुका पालम या ठिकाणचे रहिवाशी होते. या अपघातामुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. (Parbhani Accident News)

काय घडले नेमके?

परभणीच्या पालम तालुक्यातील रावराजुरी येथील श्रीनिवास कल्याणराव शिंदे व शिवाजी शिंदे आजोबा आणि नातू गंगाखेड इथे रुग्णालयात उपचार करण्यासाठी जात होते. यादरम्यान त्यांची गाडी गंगाखेड नांदेड महामार्गावरील मालेवाडी पाटीलजवळ आली असता नांदेडकडे जाणाऱ्या बसच्या चाकाखाली त्यांची दुचाकी सापडली आणि या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर या दोघांचे मृतदेह गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयामध्ये शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आले आहेत.

या भीषण अपघाताची माहिती काही नागरिकांनी गंगाखेड पोलिसांना दिली.
यानंतर गंगाखेड पोलिस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर तातडीने घटनास्थळी दाखल झाले
आणि पंचनामा केला. त्यानंतर श्रीनिवास कल्याणराव शिंदे व शिवाजी शिंदे यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी
गंगाखेड येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. या घटनेमुळे रावराजुर गावामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

Web Title :-  Parbhani Accident News | grandfather and grandson died on the spot in bike and bus accident parbhani crime news

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Hasan Mushrif | राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या अडचणीत वाढ; पोलिसांत गुन्हा दाखल

Devendra Fadnavis | ब्राह्मण समाज काही मागत नाही हे त्यांचे वैशिष्ट्य – देवेंद्र फडणवीस

Pune Kasba Peth Bypoll Election | पराभव दिसत असल्याने धंगेकर सहानुभूति निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, भाजपचा धंगेकरांवर आरोप (व्हिडिओ)