Parbhani Crime | दुर्दैवी ! कपडे धुण्यासाठी तलावावर गेलेल्या 5 जणींचा बुडून मृत्यू; परिसरात हळहळ

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन – Parbhani Crime | परभणीच्या पालम तालुक्यातील बनवसच्या तुळशीराम तांडा येथे पाच जणींचा बुडून मृत्यू (Died) झाल्याची दुर्दैवी घटना (Parbhani Crime) घडली आहे. कपडे धुण्यासाठी तलावावर गेलेल्या 5 जणींचा बुडून मृत्यू झाला आहे. तलावावर कपडे धुताना मुलीचा पाय घसरला. ती बुडायला लागली म्हणून तिला वाचवण्यासाठी आलेल्या अन्य 4 जणींचाही बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना शनिवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास घडली.

 

राधाबाई धोंडीबा आडे (Radhabai Dhondiba Aade), मुलगी दीक्षा धोंडिबा आडे (Diksha Dhondiba Aade), मुलगी काजल धोंडिबा आडे (Kajal Dhondiba Aade), तसेच सुषमा संजय राठोड (Sushma Sanjay Rathore) व अरुणा गंगाधर राठोड (Aruna Gangadhar Rathore) असं पाण्यात बुडून मृत्यू पावलेल्याची नावे आहेत. (Parbhani Crime)

याबाबत माहिती अशी की, या पाच जणी तुळशीराम तांडा येथील पाझर तलावांमध्ये (Pazar Lake) धुणे धुण्यासाठी गेलेल्या होत्या. धुणे धुत असतानाच एकीचा पाय घसरला. तिला वाचवण्यासाठी गेलेल्या अन्य 4 जणींचाही तलावात बुडून मृत्यू झाला आहे. तलावात बुडणाऱ्या मुलगी आणि वाचवण्यासाठी गेलेल्या 4 जणी, असे एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात 5 जणींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

 

दरम्यान, 5 जणी बुडत असल्याचे जवळच खेळत असलेल्या एका 10 वर्षीय मुलाने बघितले.
त्यानंतर त्याने आरडाओरडा केल्यावर गावकरी जमले. त्या पाचही जणींना तलावातून बाहेर काढले.
मात्र तोवर उशीर झाला होता. या घटनेबाबत माहिती समजताच पोलिसांनी (Police) घटनास्थळी धाव घेतली.
आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

 

Web Title :- Parbhani Crime | five women and girl drowned dead in parbhani district crime news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा