Parbhani Crime News | घरात बहिणीच्या लग्नाची तयारी सुरु असताना चुलत भावाची आत्महत्या

परभणी : पोलीसनामा ऑनलाईन – Parbhani Crime News | परभणीमध्ये एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये रात्रभर चुलत बहिणीच्या लग्नाचा स्वयंपाक केल्यानंतर चुलत भावाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. त्याने शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास लावून आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. ही घटना परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील महापूर या ठिकाणी घडली आहे. घरात एवढे शुभ कार्य सुरु असताना या तरुणाने अचानक अशी आत्महत्या का केली हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. (Parbhani Crime News)

काय आहे संपूर्ण प्रकरण?
अनंत मुलगीर असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील महातपुरी येथील अनंत मुलगीर याच्या चुलत बहिणीचे लग्न होते. त्यामुळे त्याने रात्रभर बहिणीच्या लग्नाचा स्वयंपाक केला. त्यानंतर शेतामध्ये जाऊन जनावरांना पाणी पाजून येतो, असे सांगून तो सकाळी पाच वाजताच्या सुमारास शेतात गेला तो परत आलाच नाही. त्याने त्याच ठिकाणी लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. त्याने बहिणीच्या लग्नाच्या दिवशी हे पाऊल उचलल्यामुळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे. (Parbhani Crime News)

या घटनेची माहिती मिळताच सोनपेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून अनंत मुलगीर याचा मृतदेह गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयामध्ये शव विच्छेदनासाठी पाठवण्यात आला. या तरुणाने शुभ कार्याच्या दिवशी आत्महत्या केल्याने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. बहिणीच्या लग्नाच्या दिवशी चुलत भावाने आत्महत्या केली असल्याने मुलगीर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या तरुणाने नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली याचा तपास सोनपेठ पोलिस करत आहेत.

Web Title :- Parbhani Crime News | parbhani brother ends life ahead of sister wedding by hanging self to lemon tree