अकाली प्रसूती नको असल्यास आहारात ‘या’ गोष्टीचा करा समावेश, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – आई होण्यासाठी त्यांच्या तयारीबद्दल सावधगिरी बाळगली पाहिजे. जर आपल्याला अकाली प्रसूती होण्याचा धोका कमी करायचा असेल तर आपल्या रोजच्या आहारात माशांचा समावेश करा. अकाली बाळांना जन्म देणार्‍या ३७६ महिलांचा अभ्यास केल्यानंतर हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी हा दावा केला आहे. माशांमध्ये ओमेगा -३ फॅटी ॲसिडस्, डीएचए आणि ईपीए सारखे पोषक घटक मोठ्या प्रमाणात असतात.

जेव्हा गर्भधारणेच्या पहिल्या सहा महिन्यांत शरीरात हे घटक मुबलक प्रमाणात उपलब्ध होतात तेव्हा अकाली प्रसूती होण्याचा धोका दहापटीने कमी होतो. मुख्य संशोधक डॉ. जर्दर ओलसन यांनी गर्भवती महिलांना आठवड्यातून किमान तीन वेळा मासे खाण्याचा सल्ला दिला आहे. तसेच ज्या महिला मांस टाळतात त्यांच्यासाठी फिश-ऑयल सप्लीमेंट घेणे फायदेशीर ठरू शकते. ‘जर्नल ऑफ मेडिसिन’ च्या अंकात नुकतेच या अभ्यासाचे निकाल प्रकाशित झाले आहेत.