‘पोरगा माझा नवसाचा’… नवस फेडण्यासाठी मुलाला ८ किमी विवस्त्र चालवले

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन –‘नवरा माझा नवसाचा ‘ या मराठी चित्रपतातील कथा आता सोलापुरात सत्यात उतरलीय … या चित्रपटातील कथेप्रमाणे सोलापुरातील जोडप्याने  तीन वर्षाच्या मुलाला तब्बल आठ किलोमीटर विवस्त्र चालवत नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेवरून आपण कोणत्या जमान्यात राहतोय ? असा सवाल निर्माण झाला आहे.
खरेतर आजच्या २१ शतकात देखील नवस फेडण्याच्या अशा प्रकारावरून आपण नक्की कुठे जात आहोत असे वाटते. सोलापुरातील ही  घटना म्हणजे जग २१ व्या शतकात जरी वाटचाल करत असले, तरी देशातल्या या गोष्टी आपण अजूनही मागच्याच शतकात असल्याचं सिद्ध करत आहेत.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, सोलापूर येथील  संगमेश्वर नगरमध्ये राहणारे नागेश रणधिरे आणि त्यांची पत्नी शीतल रणधिरे  या दाम्पत्याने  मुल होण्याकरिता सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेल्या हिप्परगानजीकच्या मश्रुम या गणपतीला नवस केला होता . आणि त्यांना मुल झाले देखील . मग हा नवस पूर्ण करण्यासाठी बुधवारी सकाळी या दाम्पत्याने तीन वर्षाच्या चिमुरड्याला तब्ब्ल आठ किलोमीटर विवस्त्र चालवत नेले . इतक्या लहान चिमुरड्याला फक्त एका नवसासाठी आठ  किलोमीटर विवस्त्र  चालवणे ही सारासार बुद्धीला न पटणारी गोष्ट आहे. खरेतर नवरा माझा नवसाचा या चित्रपटात देखील पुतळ्याला नवस फेडण्याकरिता नेताना  दाखवले आहे. मात्र सोलापूर येथील या घटनेत चक्क तीन वर्षाच्या मुलाला विवस्त्र चालवले आहे.
सदर घटना सोलापूरमधील संगमेश्वर नगर येथे घडली आहे. बाप्पा नवसाला पावल्यामुळे आपल्या लहानग्या चिमुरड्याला आठ किमी विवस्त्र चालवत नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. संगमेश्वर नगरमध्ये राहणारे ट्रक चालक नागेश रणधिरे आणि त्यांची पत्नी शीतल रणधिरे यांनी बाळासाठी नवस केले होता. नवस पूर्ण झाल्यानंतर मुलाला आठ किमी विवस्त्र चालवत तुझ्या दर्शनाला घेऊन येऊ असा नवस सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेल्या हिप्परगानजीकच्या मश्रुम या गणपतीला केला होता. त्याप्रमाणे रणधिरे कुटुंबाचा नवस पूर्ण झाल्याने तो नवस फेडण्यासाठी बुधवारी सकाळी या दाम्पत्याने चिमुरड्याला घेऊन संगमेश्वर येथून मुख्य रस्त्याने चालवत नेल्याचा प्रकार समोर आला आहे.
जाहिरात