सुदृढ आणि निरोगी मुलं बनवण्यासाठी आहाराबाबत पालकांनी लक्षात ठेवाव्या ‘या’ 5 गोष्टी, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – प्रत्येक आई वडीलांनी आपल्या मुलांच्या आहारावर लक्ष देणे गरजेचं आहे. कारण मुलांना उत्तम आहार दिला तरच मुलांचे आरोग्य निरोगी राहते आणि मूल सुदृढ बनतात. मात्र सध्या अनेक पालकांना स्वतः लाच योग्य आहार घेण्याची सवय नाही त्यामुळे त्यांच्या या सवयींचा परिणाम त्यांच्या मुलांवर देखील पडू शकतो. त्यामुळे मुलांना चांगल्या सवयी लावणे गरजेचे आहे जर तुमच्या मुलांना तुम्हाला सुदृढ आणि निरोगी ठेवायचे असेल तर योग्य आहार देणे गरजेचे आहे आणि पुढील गोष्टी लक्षात ठवणे देखील गरजेचे आहे.

दूध पिण्याची सवय
अनेक महिला तक्रार करत असतात की त्यांची मूळ दूध पीत नाहीत. मात्र जर मुलगा दूध पिण्यासाठी नकार देत असेल तर त्यावर जबरदस्ती करू नका. त्याची इच्छा असेल तेव्हाच त्याला दूध पिऊ द्या. विशेष म्हणजे तो दूध पीत नाही म्हणून दुधात कोणत्याही फ्लेवरची पावडर टाकू नका. शक्यतो ताजे आणि शुद्ध दूधच मुलांना प्यायला द्या आणि मुलांना लहान पणापासूनच दूध पिण्याची सवय लावा म्हणजे मुलांना वारंवार आग्रह करावा लागणार नाही आणि मूळ स्वतः हून दूध पीतील.

बसून जेवण चारा
व्यक्ती मोठा असो वा लहान सर्वांना जमिनीवर बसून जेवण करायला हवे. तुम्ही सुद्धा खाली बसून आपल्या मुलाला जेवण चारा यामुळे मुलांचा चांगला विकास होईल. याचे दोन फायदे आहेत जर तुम्ही जमिनीवर बसून जेवण करताय तर ते तुमच्या कपड्यांवर सांडत नाही आणि दुसरं म्हणजे जमिनीवर बसून जेवल्याने शरीराचा मणका देखील उत्तम राहतो.

जेवण झाल्यानंतर खेळणे
शरीराला प्रोटीन आणि कॅल्शिअमची खूप जास्त गरज असते त्यामुळे जेवण झाल्यानंतर मुलांना झोपू द्या किंवा जर मुलांना एखादे खेळ खेळायचे असतील तर खेळूद्या यामुळे मुलांमध्ये ऊर्जा येते. जेवल्यानंतर तासाभराने मुलाला झोप आली असले तर झोपू द्या. मोठ्या व्यक्तींनी सुद्धा जेवण झाल्यानंतर थोडा वेळ फिरले पाहिजे.

वेळेवर झोप घेणे महत्वाचे
मुलांच्या आरोग्यासाठी वेळेवर झोपणे आणि पूर्ण झोप घेणे खूप गरजेचे आहे. जर मुलं वेळेवर झोपत नसतील आणि त्यांची झोप पूर्ण होत नसेल तर त्यांच्या शिकण्याच्या क्षमतेवर खूप परिणाम होतो. त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलांना वेळेत झोपण्याची आणि वेळेत उठण्याची सवय नक्की लावा.

जेवताना टीव्ही न पाहणे
तुम्हाला किंवा तुमच्या मुलांना जेवताना टीव्ही पाहण्याची सवय असेल तर लवकर ही सवय बदला कारण हे आरोग्यासाठी चांगले नाही. जेवताना टीव्ही बघितल्यावर जेवणातील पूर्ण पोषक घटक आपल्याला मिळत नाहीत कारण आपले जेवणावर पूर्ण लक्ष नसते. त्यामुळे मुलांना जेवताना टीव्ही पाहून देऊ नका.

Visit : Policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like