Parineeti And Raghav Chadha | परिणीती आणि राघव चड्ढा यांनी केली महाकालची पुजा; व्हिडिओ व्हायरल

पोलीसनामा ऑनलाइन – लवकरच लग्नबंधनामध्ये अडकणारे सेलिब्रिटी कपल अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आपचे खासदार राघव चड्ढा (Parineeti Chopra And Raghav Chadha) हे अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. या अनोख्या कपलचा मोठा चाहता वर्ग निर्माण झाला असून त्यांच्या वेडिंग अपेडट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. या कपलने आपले साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करुन नेटकऱ्यांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला होता. आता लवकरच हे कपल येत्या 27 सप्टेंबर रोजी लग्नबंधनामध्ये अडकणार (Parineeti And Raghav Wedding Date) आहे. दोघांनी अद्याप लग्नाच्या तारखेवर प्रतिक्रिया दिली नसली तरी देखील चाहत्यांना त्यांच्या लग्नाबद्दल खूप उत्सुकता आहे. अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि खासदार राघव चड्ढा (Parineeti Chopra And Raghav Chadha) हे नुकतेच उज्जैनच्या महाकाल मंदिरामध्ये पुजा करताना दिसून आले आहेत. महाकालची पुजा अर्चा करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अभिनेत्री परिणीती चोप्रा व खासदार राघव चड्ढा यांनी साखरपुडा (Parineeti And Raghav Engagement) करत आपल्या नात्याची कबुली दिली होती. अनेकदा हे लवली कपल एकमेंकासोबत क्वालिटी टाईम स्पेंड करताना दिसतात. परिणीती व राघव यांना अनेकदा पापाराझी स्पॉट करत असतात. यावेळी त्यांचा उज्जैनमध्ये (Parineeti And Raghav Chadha At Mahakal) पुजा करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडिय़ावर व्हायरल होत आहे. यामध्ये परिणीती चोप्रा हिने पिंक कलरची साडी परिधान केली आहे तर राघव देखील ट्रेडिशनल लूकमध्ये दिसत आहे. दोघांनीही कपाळावर मोठा गंध लावला असून ते महाकालच्या पुजेमध्ये मग्न असलेले दिसून येत आहे. परिणीती व राघवचा हा भक्तीमय व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अनेकांनी यावर कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

परिणीती चोप्रा व राघव चड्ढा (Parineeti Chopra And Raghav Chadha) हे कपल आता अनेक महिन्यांपासून लाईमलाईटमध्ये आहे. यांच्या अफेअरच्या चर्चा अनेक दिवसांपासून रंगत होत्या. त्यांनी 13 मे रोजी साखरपुडा करुन सर्वांना आश्चर्यचकित केले. त्यांच्या या रॉयल साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यांच्या साखरपुड्य़ाला अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) देखील संपूर्ण फॅमिलीसह उपस्थित होती. आता परिणीती चोप्रा व राघव चड्ढा हे कपल लग्नबंधनामध्ये (Parineeti And Raghav Wedding) अडकणार आहे. त्यापूर्वी त्यांनी मध्य प्रदेशमधील (MP) महाकालचे दर्शन घेतले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | कोंढवा : बंदुकीच्या गोळी सारखी पुंगळी आढळून आल्याने खळबळ