Parineeti And Raghav Chadha | ‘या’ तारखेला लग्नगाठ बांधणार परिणीती चोप्रा आणि राघव चढ्डा

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवुड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पार्टीचे खासदार राघव चढ्डा (Parineeti Chopra And Raghav Chadha) ही जोडी सध्या सर्वत्र गाजते आहे. या सेलिब्रिटी कपलचा मोठा चाहता वर्ग निर्माण झाला असून चाहते त्यांच्या लग्नाची (Parineeti And Raghav Wedding) आतुरतेने वाट पाहत आहेत. परिणीती चोप्रा आणि राघव चढ्डा यांनी 13 मे रोजी धुमधडाक्यात साखरपुडा केला. त्यांचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. या साखरपुड्य़ाला अनेक सेलिब्रिटी लोकांनी हजेरी लावली होती. पण तेव्हापासून चाहते या लग्नाची वाट पाहत असून आता राघव व परिणीती (Parineeti Chopra And Raghav Chadha) यांच्या लग्नाची तारीख समोर आली आहे.

मागील काही वर्षांमध्ये अनेक बॉलीवूड सिलेब्रिटींनी परदेशामध्ये जाऊन लग्नगाठ बांधली आहे. मात्र अभिनेत्री परिणीती चोप्रा व राघव चढ्डा हे भारतामध्येच डेस्टिनेशन वेडिंग करणार आहे. त्यांचा लग्नसोहळा उदयपुरमधील (Udaipur) ओबेरॉय उदयविलास रिसॉर्टमध्ये (Oberoi Udayavilas Resort) पार पडणार आहे. पिछोला लेकच्या किनारी हे पंचतारांकित हॉटेल आहे. राघव चढ्डा आणि परिणीती यांचे लग्न अवघ्या एक महिन्यात होणार आहे त्यामुळे दोघांच्या कुटुंबांमध्ये लग्नघाई पाहायला मिळत आहे. बॉलीवुड प्रसिद्ध अभिनेत्री परिणीती व राजकारणी राङव चढ्डा हे येत्या 25 सप्टेंबरला लग्न बंधनात (Parineeti And Raghav Wedding Date) अडकणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र या तारखेबद्दल व लग्नाच्या ठिकाणाबद्दल दोघांनी बोलणे टाळले आहे.

सध्या सर्वत्र लोकप्रिय झालेल्य़ा या कपलची साखरपुड्याच्या आधीपासून चर्चा रंगली होती. अनेकदा ते एकमेंकांसोबत क्वालिटी टाईम स्पेंड करताना स्पॉट केले जात होते. मात्र मे महिन्यामध्ये त्यांनी साखरपुडा करुन सर्वांना सुखद धक्का दिला. आता लवकरच हे कपल लग्न देखील करणार आहे. परिणीती आणि राघवच्या (Parineeti Chopra And Raghav Chadha) साखरपुड्याला अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) संपूर्ण कुटुंबासह भारतामध्ये आली होती. आता हे लवली कपल येत्या सप्टेंबर महिन्यामध्ये लग्न करणार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | प्रतिबंधात्मक आदेशाचा भंग केल्याप्रकरणी 30-40 जणांवर FIR, येरवडा परिसरातील प्रकार

Dhananjay Munde | आता खतांसाठीही 100 टक्के अनुदान मिळणार – कृषीमंत्री धनंजय मुंडे