‘मेहुणी’ परिणिती चोपडाच्या गाण्यावर जिजा निकनं केला अफलातून विनोदी डान्स ! (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोपडा आणि निक जोनासची जोडी नेहमीच चर्चेत असते. याचे कारण म्हणजे या कपलचे फोटो आणि व्हिडीओ. सध्या निक जोनासचा एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यात निक डान्स करत आहे. काहीसा विनोदी असा निकचा डान्स सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ अभिनेत्री परिणिती चोपडानेच शेअर केला आहे. प्रियंकाने एकदा सांगितलं होतं की, निकला पंजाबी गाणे आवडतात.

निकच्या डान्सचा व्हिडीओ शेअर करताना परिणितीने खास कॅप्शनही दिलं आहे. आपल्या कॅप्शनमध्ये ती म्हणते, “वास्तविक पाहता निकने सिद्धार्थपेक्षाही छान डान्स केला आहे.” सध्या हा व्हिडीओ सोशलवर शेअर होताना दिसत आहे.

निक जोनासचा डान्स चाहत्यांनाही खूप आवडला आहे. काही तासातच हा व्हिडीओ 1 मिलियन लोकांनी पाहिला आहे. हजारो चाहत्यांनी निकच्या व्हिडीओवर कमेंट केली आहे.

परिणितीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, सध्या परिणिती सायना नेहवालच्या बायोपिकमध्ये खूपच बिजी आहे. सायनाप्रमाणेच स्वत:ला फिट ठेवण्यासाठी परिणिती खूप मेहनत करताना दिसत आहे.

Visit : Policenama.com