Mumbai Viral Video : ‘अ‍ॅटोमॅटिक’च चालू लागली बाईक, Horror सिनेम्यात नव्हे तर प्रत्यक्षात, पाहा व्हिडीओ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  एखाद्या हॉरर फिल्म किंवा मालिकेमध्ये चालक शिवाय गाडी चालत असल्याचे दाखवण्यात येते. असे दृष्य फक्त चित्रपट किंवा माहिलेतच पाहिले असेल. पण प्रत्यक्षात असे दृष कधी पाहिले आहे का ? याचे उत्तर आहे नाही. मात्र सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला हॉरर फिल्ममधील वाटेल. पण तो रिअल मधील आहे.

सोशल मीडीयावर व्हायरल असलेला व्हिडीओ पाहून तुम्ही देखील शॉक व्हाल. तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. हा शॉकिंग व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

बाईक सुरु करण्यासाठी एखाद्या व्यक्तीची गरज लागते. पण या व्हिडीओमध्ये दिसणारी बाईक माणसाशिवायच आपोआप सुरु झाली. व्हिडीओत पाहू शकता रस्त्यावर पार्किंगमध्ये आणखी काही बाईक दिसत आहे. त्या ठिकाणी एकही माणूस दिसत नाही. काही वेळात एक बाईक आपोआप सुरु होते आणि ती चालू लागते. बाईक सुरु होऊन टर्न घेते आणि काही अंतर चालते देखील आणि नंतर ती जमिनीवर कोसळते.

ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. फुटेजमधील तारखेनुसार ही घटना डिसंबर 2020 मधील आहे. पण आता त्याचा व्हिडीओ ट्विटरवर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ शेअर करणाऱ्यानं देखीलकॅमेऱ्यात कैद झालं नाहीतर विश्वासच बसला नसता, असं कॅप्शन दिलं आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. अनेकांनी हा व्हिडीओ पाहून विश्वास बसत नाही असं म्हटलं आहे. यावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहे.