धक्कादायक ! राज्यात ‘या’ तुरुंगात कैदीच करत आहेत पोलिसांविरोधात ‘उपोषण’

पंढरपूर/सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – एखाद्या मागणीसाठी नागरिकांना किंवा सामाजिक कार्यकर्त्यांना उपोषण करताना पाहिले असेल किंवा ऐकले असेल. मात्र सोलापूर जिल्ह्यातील एका कैद्याने पोलीस निरीक्षक आणि इतर पोलिसांवर कारवाई करण्यासाठी उपोषण सुरु केले आहे.

पोलीस कोठडीत मारहाण केल्याप्रकरणी पंढरपूर तालुक्यातील करकंब पोलीस ठाण्यातील पोलीस उप निरीक्षक आणि इतर पोलिसांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब चव्हाण यांनी गुरुवार पासून तुरुंगात अन्नत्याग उपोषण सुरु केले आहे. चव्हाण यांच्या आजचा उपोषणाचा आजचा दुसरा दिवस असून त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु करावेत अशी मागणी त्यांच्या कुटुंबीयांनी केली आहे.

पंढरपूर तालुक्यातील पटवर्धन कुरोली येथील सामाजिक कार्य़कर्ते दादासाहेब चव्हाण आणि करकंब पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये अनेक दिवसांपासून जुना वाद आहे. चव्हाण यांनी करकंब पोलीस ठाण्यात अंतर्गत चालणाऱ्या अवैध व्यवसायाविरुद्ध आवाज उटवल्याने यापूर्वी पोलीस उपनिरीक्षक पाटील यांच्यासोबत वाद झाले होते. यामध्ये पोलीस उपनिरीक्षक पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होत. तेव्हापासून चव्हाण आणि पोलीसी कर्मचाऱ्यांमध्ये वाद निर्माण झाले.

दरम्यान, शेतीच्या कारणावरून दादासाहेब चव्हाण यांच्यावर करकंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी चव्हाण यांना पोलीस कोठडीत ठेवण्यात आले होते. दरम्यान, करकंब पोलिसांनी चव्हाण यांना अश्लिल शिवीगाळ करत बेदम मारहाण केली होती. याची तक्रार चव्हाण यांनी न्यायालयात केली होती. तक्रारीची दखल घेत त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यामध्ये त्यांना मारहाण करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पोलीस उपनिरीक्षक प्रशांत पाटील, पोलीस नाईक दादासाहेब सूळ, अरुण कोळवले, भोसले, हेंबाडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी न्यायालयात करण्यात आली.

न्यायालयाने तक्रारीची दखल घेत तसा जबाब नोंदवला. मात्र, अद्याप संबंधितांवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. मारहाण करणाऱ्या पोलिसांवर तात्काळ कारवाई करावी या मागणीसाठी चव्हाण यांनी गुरुवार पासून तुरुंगातच अन्नत्याग उपोषण सुरु केले आहे. आज दुसऱ्या दिवशीही त्यांचे उपोषण सुरु असून त्यांची प्रकृती खालावली आहे. दरम्यान, चव्हाण यांनी तुरुंगात सुरु केलेले उपोषण मागे घ्यावे यासाठी पोलिसांकडून त्यांच्यावर दबाव टाकला जात असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/