केबिन क्रूच्या चुकीमुळे जेट एअरवेजच्या विमानात प्रवाशांचा जीव आला धोक्यात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

जेट एअरवेजच्या विमानातील कर्मचाऱ्याच्या एका चुकीमुळे जवळपास १६६ हून अधिक प्रवाशांचा जीव धोक्यात आला होता. आज सकाळी जेट एअरवेजच्या मुंबई-जयपूर विमानाने उड्डाण भरल्यानंतर काही वेळातच पुन्हा ते मुंबईत लँड करावे लागले आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’c99b0993-bc95-11e8-8d86-8d08be7109c2′]

उड्डाणादरम्यान केबिनमधील हवेच्या दाबाचा समतोल राहावा, यासाठी असलेले स्वीचच सुरू करण्यात आले नव्हते. स्वीच सुरू करण्यात न आल्याने विमानात हवेचा दाब वाढला. केबिन क्रूच्या या एका चुकीमुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. विमानामध्ये एकूण १६६ प्रवासी होते. यातील ३० जणांच्या कान-नाकातून रक्तस्त्राव होऊ लागला. तर काही जणांना डोकेदुखीचा त्रास होऊ लागला. या घटनेनंतर विमान पुन्हा मुंबईकडे आणण्यात आले.

पिंपरी मतदार संघातील चार हजार ६४५ मतदारांची नावे वगळणार

मुंबई विमानतळावर हे विमान सुरक्षितपणे उतरविण्यात आले असून त्रास झालेल्या ३० प्रवाशांना तातडीने प्राथमोउपचार देण्यात आले. प्रवाशांची अन्य विमानात सोय करुन देण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रालयाने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.