वाहतूक नियमांचे उल्लंघन कराल तर पासपोर्ट मिळण्यात येऊ शकतात अडचणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

पुणे शहरातील वाहतूक सुरक्षित व सुरळीत चालण्यासाठी वाहतूक शाखेकडून वाहनचालकांना शिस्त लागवी यासाठी ई-चलनद्वारे व सीसीटीव्हीद्वारे वाहन चालकांवर कारवाई करण्यात येते. परंतु वाहन चालक याकडे दुर्लक्ष करत असल्याने अनेक केसेस प्रलंबीत आहेत. त्यामुळे वाहतूक शाखेने पासपोर्ट आणि चारित्र्य पडताळणी कार्यालयास याची माहिती देऊन ज्या कोणी वाहन चालकाने वाहतूकीचे नियम मोडले आहेत, त्या वाहनचालकाला यापुढे पासपोर्ट आणि चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र मिळण्यास अडचण येऊ शकते.
[amazon_link asins=’B0784D7NFX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d9ab44a3-ad27-11e8-971b-ad0570eee732′]

वाहतूक शाखेकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांना एसएमएस द्वारे माहिती दिली जाते. मात्र वाहन चालक याकडे दुर्लक्ष करुन दंड भरत नसल्याने अनेक केसेस प्रलंबीत आहेत. वाहतूक शाखेकडून २६ ऑगस्ट पासून अशा प्रलंबीत केसेसची माहिती पासपोर्ट, चारीत्र्य पडताळणी जोडण्यात आली आहे. त्यामुळे पासपोर्ट व चारित्र्य पडताळणीसाठी जे अर्ज आलेले आहेत त्यांचेवरील प्रलंबीत चलनांची माहिती त्वरीत पासपोर्ट शाखेला प्रात होते.

महाराष्ट्र पोलिसांनी स्वीकारले गुजरात मॉडेल : नवाब मलिक 

२६ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट दरम्यान ९२ पासपोर्टसाठी अर्ज केलेल्या अर्जदारांवर केसेस प्रलंबीत असल्याचे उघडकीस आले आहे. ही माहिती पासपोर्ट विभागाला कळविण्यात आलेली आहे. त्यामुळे त्यांना पासपोर्ट मिळणे अडचणीचे ठरणार आहे. तसेच याची नोंद चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्रातदेखील होणार आहे. तसेच अशा वाहनचालकांना खासगी व शासकीय नोकरी, वाहन परवाना न देण्याची शिफारस करण्यात येणार आहे. वाहन चालकांनी वाहतूकीच्या नियमांचे पालन करुन वाहतूक पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

काेरेगांव भीमा अांदाेलन भडकावण्यासाठी पाच लाखाचे फडिंग