‘कोरोनिल’वर आचार्य बाळकृष्ण यांचा यू-टर्न, म्हणाले आम्ही ‘कोरोना’वर औषध बनवलं नाही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   कोरोना व्हायरसवर प्रतिबंध घालण्यासाठी सध्या जगभरात लस शोधण्याचं काम सुरु आहे. अनेक देशांनी कोरोनावर प्रभावी लस शोधल्याचा दावाही केला होता. यातच योगगुरू बाबा रामदेव यांनी देखील कोरोनावर औषध निर्माण केल्याचा दवा केला होता. त्यानंतर बाबा रामदेव यांनी कोरोना व्हायरसवरील ‘कोरोनिल’ हे आयुर्वेदिक औषध लॉन्च केले होते. त्यानंतर अनेक या औषदावरून अनेक वाद निर्माण झाले होते. अशातच पंतजली योग पिठाने आपल्या दाव्यावरून यू-टर्न घेतला आहे. कोरोनिल हे औषध उपचारासाठी नाही, तर रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारं असल्याचं पतंजलीकडून सांगण्यात आलं आहे.

आचार्य बाळकृष्ण यांनी सांगितले की, क्लिनिकल ट्रायल केल्यानंतर जो निष्कर्ष आला तो आम्ही संपूर्ण देशाला सांगितला. आम्ही असं म्हणालो नाही की, हो औषध कोरोनावर उपचार म्हणून वापरलं जाऊ शकतं. आम्ही जसं म्हणालो होतो की, या औषधाच्या क्लिनिकल ट्रायल दरम्यान, कोरोना बाधित रुग्ण कोरोनामुक्त झाले होते. यामध्ये काहीच शंका घेण्यासारखे नाही.

बाळकृष्ण यांनी सांगितले की, अनेकांचं असं म्हणणं आहे की, क्लिनिकल ट्रायल खोटं आहे. कोण म्हणतंय आम्ही केलेला दावा खोटा आहे. आम्ही कधीच नाही म्हणालो की आम्ही कोरोनाचं औषध तयार केलं आहे. आम्ही हे म्हणालो की, आम्ही तयार केलेल्या औषधाच्या क्लिनिकल ट्रायलमध्ये कोरोनाच रुग्ण बरे झाले आहेत.

काय होता पतंजलीचा दावा ?

23 जून रोजी पतंजलीचे योगगुरू बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी बाबा रामदेव म्हणाले होते की, संपूर्ण सायंटिफिक डॉक्यूमेंटच्या आधारे श्वासारी वटी, कोरोनिल ही कोरोनावरील एविडेंस बेस असलेलं पहिलं आयुर्वेदिक औषध आहे. पतंजलीच्या मते, हा रसर्च संयुक्तपणे पतंजली रिसर्च इंस्टीट्यूट हरिद्वार, नॅशनल इंस्टिट्युट ऑफ मेडिकल सायंस जयपूरने केला आहे. या औषधाच्या निर्मिती दिव्य फार्मसी, हरिद्वार आणि पतंजली आयुर्वेद लिमिटेड, हरिद्वारकडून केला जात आहे.