Parbhani : गुलशन नगर भागात 4 लाख 80 हजार 240 रुपयांचा गुटखा पकडला; पाथरी पोलिसांची कारवाई

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन- बेकायदेशीरपणे गैर उद्देशाने पत्र्याच्या शेडमध्ये साठा करून ठेवलेला गुटखा पाथरी पोलिसांनी 29 मार्च रोजी सोमवारी पहाटे पकडला असून यात तीन आरोपींवर गुन्हा दाखल केला. पाथरी पोलिस सूत्रांकडून याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, सेलु कॉर्नर भागातील गुलशन नगरमध्ये सद्दाम चाऊस यांच्या पत्र्याच्या शेडमध्ये हा साठा ठेवला असल्याची गुप्त माहिती खबर यामार्फत मिळाली.

खबर्‍याने दिलेल्या माहितीची पुष्टी झाल्यानंतर याबाबत वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना माहिती देण्यात आली. यावरून बेकायदेशीररित्या विक्रीसाठी साठा करून ठेवलेल्या शेड वर पोलिसांनी पहाटेच्या सुमारास छापा टाकला. यात 4 लाख 80 हजार 240 रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा पोलिसांनी पकडला.

यात तीन आरोपींविरुद्ध पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. या कारवाईवरून हे स्पष्ट झाले की शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा विक्रीसाठी आणला जातो. आवेज खान, परवेज खान व सद्दाम चाऊस या तीन आरोपींविरुद्ध पाथरी पोलीस ठाण्यात पोलीस नाईक महेश गजभार /515 यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद झाला. महाराष्ट्र राज्यात बंदी घातलेला गुटखा तस्करी आणि बेकायदेशीर विक्रीसाठी साठा करून ठेवल याबद्दल वरील आरोपींविरुद्ध 328, 272, 273, 188 विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पाथरी पोलिस करीत आहे.