पवना धरण 39 टक्क्यांवर

पिंपरी चिंचवड : पोलीसनामा ऑनलाइन
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणाचा जलसाठा 39 टक्क्यांवर आला असून शहरवासींयावर पाण्याच्या टंचाईची वेळ आली आहे. पवना धरणात 39.92 टक्के पाणीसाठा असून जूनपर्यंत पुरेल एवढा हा साठा आहे. परंतु, पावसाने उशीर केल्यास पाणी टंचाईला सामोरे जावे लागेल. हे टाळण्यासाठी पाणीपुरवठा विभाग पाणीकपात करण्याचा विचार करत आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत शहरात दैनंदिन पाणीपुरवठा केला जातो. पवना धरणातून दिवसाला नदीपात्रत 30 ते 35 दक्षलक्ष घनफूट पाणी सोडले जाते. आज मितीला पवना धरणात 39.92 टक्के पाणीसाठा असून गेल्या वर्षी याच दिवशी 39 टक्के पाणीसाठा होता. हा पाणीसाठा जूनपर्यंत पुरेल एवढा आहे. दहा दिवसात धरणातील चार टक्के पाणीसाठा कमी झाला आहे. त्यामुळे मे महिन्यात पाणी कपात करण्याची वेळ येऊ शकते, असा अंदाज पाणीपुरवठ्याच्या अधिका-यांकडून व्यक्त केला आहे.

यावर्षी पवना धरणात 39.92 टक्के पाणीसाठा असून गेल्या वर्षी याच दिवशी 39 टक्के पाणीसाठा होता. हा पाणीसाठा जूनपर्यंत पुरेल एवढा आहे. तीव्र उन्हामुळे पाणी साठ्यात कमालीची घट होत असून गेल्या दहा दिवसात चार टक्‍के पाणीसाठा कमी झाला आहे. पावसाने ओढ दिल्यास पाणीटंचाईला सामोरे जाण्याची वेळ येऊ नये, यासाठी पाणीकपात करणे आवश्यक असल्याची माहिती अभियंता मनोहर खाडे यांनी दिली आहे.