Paytm-Axis Bank | Paytm चा Axis बँकेशी करार, १५ मार्चनंतर सुद्धा चालणार QR, साऊंड बॉक्स आणि EDC

नवी दिल्ली : Paytm-Axis Bank | भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) पेटीएम पेमेंट्स बँक (Paytm Payments Bank) बाबत सूचना जारी केली आहे. तसेच आता पेटीएमने म्हटले आहे की, त्यांनी मर्चेंट पेमेंटच्या सेटलमेंटसाठी अ‍ॅक्सिस बँकेसोबत (Axis Bank) पार्टनरशिप केली आहे. कंपनीने म्हटले की, वन९७ कम्युनिकेशन्सने आपले नोडल अकाऊंट एका एस्क्रॉ अकाऊंट (Escrow Account) च्या माध्यमातून अ‍ॅक्सिस बँकेत स्थलांतरित केले आहे, जे त्यांनी त्यांच्यासोबत उघडले आहे.

पेटीएमची पॅरेंट कंपनी वन ९७ कम्युनिकेशन्सने फायलिंगद्वारे माहिती दिली की पेटीएम क्यूआर, साऊंडबॉक्स आणि ईडीसी (कार्ड मशीन) १५ मार्चनंतर देखील काम करत राहतील.

पेटीएम पेमेंट्स बँकेला दिलासा
तर, भारतीय रिझर्व्ह बँकेने पेटीएम पेमेंट्स बँकेला सेवा सुरू ठेवण्यासाठी आणखी १५ दिवसाची मुदत दिली आहे.
यापूर्वी आरबीआयने पेटीएम पेमेंट्स बँकेला २९ फेब्रुवारीच्या नंतर नवीन डिपॉझिट्स घेणे आणि क्रेडिट ट्रांजक्शन्स थांबवण्याचे आदेश दिले होते.

आता पेटीएम पेमेंट्स बँकेला १५ मार्च, २०२४ पर्यंतची मुदत दिली आहे. आरबीआयने शुक्रवारी म्हटले की,
व्यापारी वर्गासह ग्राहकांचे हित लक्षात घेऊन हे पाऊल उचलण्यात आले आहे.

९ फेब्रुवारीला पेटीएमने म्हटले होते की, मार्केट रेग्युलेटर सिक्युरिटीज अ‍ॅन्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाचे माजी चेअरमन
एम दामोदरन यांच्या नेतृत्वात एक ग्रुप अ‍ॅडव्हायजरी कमिटी बनवली आहे. ही कमिटी त्यांना कम्प्लॉयन्स आणि
रेग्युलेशनबाबत सल्ला देईल. ३ सदस्यांच्या या कमिटीत इन्स्टीट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडियाचे माजी
अध्यक्ष एम. एम. चितळे आणि आंध्र बँकेचे माजी सीएमडी आर रामचंद्रन यांचा समावेश आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

3 Cops Dismissed In Pune | पुणे: हवालाचे 45 लाख रुपये लुटणारे 3 पोलीस कर्मचारी बडतर्फ; अप्पर पोलिस आयुक्त प्रविणकुमार पाटील यांची कारवाई

Pune Cheating Fraud Case | ज्येष्ठ दाम्पत्याची 60 लाखांची फसवणूक, 6 जणांवर MPID