3 Cops Dismissed In Pune | पुणे: हवालाचे 45 लाख रुपये लुटणारे 3 पोलीस कर्मचारी बडतर्फ; अप्पर पोलिस आयुक्त प्रविणकुमार पाटील यांची कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – 3 Cops Dismissed In Pune | नाशिक मुंबई महामार्गावरील (Nashik Mumbai Highway) दिवे गावात कार अडवून पोलीस असल्याचे सांगून गाडीतील हवालाचे ४५ लाख रुपये लुटणार्‍या पुणे शहर पोलीस (Pune City Police) दलातील तिघा कर्मचार्‍यांना पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील (IPS Pravinkumar Patil) यांनी ही कारवाई केली आहे.

पोलीस शिपाई गणेश मारुती कांबळे, गणेश बाळासाहेब शिंदे, दिलीप मारुती पिलाणे अशी बडतर्फ केलेल्या पोलिसांची नावे आहेत. ते सर्व जण दत्तवाडी पोलीस ठाण्यात (Dattawadi Police Station) नेमणूकीला असताना ८ मार्च २०२२ रोजी सकाळी भिवंडीजवळील दिवे गावात हा प्रकार घडला होता. तिघांविरुद्ध नारपोली पोलीस ठाण्यात (Narpoli Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्यांना निलंबित करण्यात येऊन विभागीय चौकशी केली जात होती. त्यात दोषी ठरल्याने त्यांना बडतर्फ करण्यात आले आहे.

तिघे जण एकाच पोलीस ठाण्यात नेमणूकीला असल्याने त्यांचे घरगुती संबध आहेत. दिलीप पिलाणे यांच्या बहिणीचा धार्मिक कार्यक्रम असल्याचे ते तिघे व बाबूभाई सोळंकी हे पुण्याहून दिवे येथे गेले होते. बाबुभाई सोळंकी याला त्याच्या भावाचा फोन आला. त्यावेळी गणेश कांबळे याला बाबुभाई सोळंकी याच्याकडून हवालाचे पैसे औरंगाबादमधून नाशिक मार्गे ठाणे येथे जाणार असल्याची माहिती मिळाली. त्याने गणेश शिंदे आणि दिलीप पिलाणे यांच्याशी संगनमत करुन भिवंडीजवळील दिवे गावात रामलाल परमार यांची हवालाचे पैसे घेऊन जाणारी कार अडविली. पोलिस असल्याचा धाक दाखवून वाहनाची तपासणी करुन कारवाई करण्याची भिती दाखवून गाडीतील ४५ लाख रुपये घेऊन त्यांना तेथून हाकलून दिले होते.

जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला असताना अटक चुकविण्यासाठी गणेश कांबळे याने आजारी नसताना पोलीस निरीक्षकांची दिशाभूल करुन सीक पास मिळविला. साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी विनापरवाना मुख्यालय सोडून भिवंडी येथे जाऊन गंभीर गुन्हा केला. गणेश शिंदे याने प्रशिक्षण काळात साप्ताहिक सुट्टी मिळाली नाही म्हणून साप्ताहिक सुट्टी घेतो, असे खोटे कारण दाखवून सुट्टी घेऊन भिवंडीला जाऊन गुन्हा केला. दिलीप पिलाणे यानेही पर्यायी साप्ताहिक सुट्टी घेऊन भिवंडीला जाऊन गुन्हा केल्याचे विभागीय चौकशीत सिद्ध झाले. त्यामुळे समाजात पोलिसांची प्रतिमा मलिन झाल्याने त्यांना पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune PMC News | पुणे महापालिका आयुक्तांनी कामांच्या वर्क ऑर्डर देण्याची मुदत सात मार्चपर्यंत वाढविली

Pune PMC-Abhay Yojana 2024 | ओपन प्लॉट्सच्या मिळकतकर थकबाकीदारांसाठी अभय योजना आणण्याचा अद्याप निर्णय नाही – महापालिका आयुक्त विक्रम कुमार

NCP Leader Ajit Pawar | ”संपूर्ण परिवार विरोधात गेला तरी जनता माझ्यासोबत”, अजित पवारांचे भावनिक आवाहन, सुप्रिया सुळेंवर केली टीका…

Sena Kesari 2024 In Pune | पुणे: हडपसरमध्ये रंगला राज्यस्तरीय सेना केसरी कुस्तीचा महासंग्राम (Video)