गॅस सिलेंडर बुक करा अन् 800 रुपयांचा Cashback मिळवा, 31 मे पर्यंत ऑफर मर्यादीत; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइनः देशात कोरोनाने थैमान घातले आहे. अशात काही राज्यात लॉकडाऊन केल्याने व्यवहार ठप्प झाले असून अनेकजण बेरोजगार झाले आहेत. त्यात महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. मात्र या महागाईच्या काळात LPG गॅस सिलेंडरच्या बुकींगवर पेटिएमने ग्राहकांना बंपर ऑफर दिली आहे. या ऑफर अंतर्गत ग्राहकांना 809 रुपयांचे सिलेंडर केवळ 9 रुपयांत मिळणार आहे. ग्राहकांना 31 मेपर्यंत या ऑफरचा लाभ घेता येईल.

या ऑफर अंतर्गत जर तुम्ही पहिल्यांदा पेटिएमच्या माध्यमातून गॅस बुकींग करत असाल तर तुम्हाला 800 रुपयांपर्यंतचे कॅशबॅक मिळू शकते. जेंव्हा तुम्ही LPG सिलेंडर बुकींग आणि पेमेंट कराल तेंव्हा तुमच्या स्क्रीनवर एक स्क्रॅच कार्ड मिळेल. ज्याची कॅशबॅक रक्कम 800 रुपयापर्यंत असेल. ऑफरचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी मोबाईलवर paytm app डाऊनलोड करावा लागेल. त्यानंतर गॅस सिलेंडरची बुकींग करावी लागणार आहे. त्यासाठी paytm वर Show More या पर्यायावर जाऊन क्लिक करा. त्याठिकाणी Recharge & Bills Pay असा पर्याय असेल त्यावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला बुक सिलेंडरचा पर्याय दिसेल. त्यावर जाऊन तुम्ही गॅस प्रोव्हाडर निवडा. बुकींगच्या आधी तुम्हाला FIRSTLPG चा प्रोमो कोड टाकावा लागेल. बुकींगच्या 24 तासांत तुम्हाला कॅशबॅकचा स्क्रॅच कार्ड मिळेल. या स्क्रॅच कार्डचा वापर 7 दिवसांच्या कालावधीतच करावा लागणार आहे, त्यानंतर त्याचा वापर करता येणार नाही.