PCMC News | पिंपरी – चिंचवड शहर स्मार्ट सिटीच्या मार्गावर; शहरावर सर्वत्र सीसीटीव्हीची करडी नजर

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PCMC News| पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीचे प्रकल्प (Smart City Projects) पूर्णत्वाकडे वाटचाल करत असून स्मार्ट सिटी प्रकल्पात शहर सध्या २० व्या क्रमांकावर आहे. स्मार्ट सिटीच्या २५ प्रकल्पांपैकी १६ प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण झाले असून उर्वरित नऊ प्रकल्पांचे सुमारे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. स्मार्ट सिटीचे प्रकल्पामधीलच एक महत्त्वपूर्ण असा ई-सर्व्हेलन्स (E-Surveillance) हा प्रकल्प अत्यंत नावीन्यपूर्ण आहे. या प्रकल्पांतर्गत शहरातील रस्त्यांवरील वाहनांवर करडी नजर ठेवण्यात येणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह (Shekhar Singh) यांनी सांगितले. (Pune PCMC News)

स्मार्ट सिटीचे अनेक लोकाभिमुख प्रकल्प शहरासाठी राबवण्यात येणार आहे. त्यामध्ये जीआयएस Geographic Information System (GIS) प्रकल्पाद्वारे शहरातील उंच इमारती, रस्त्यांचे मोजमाप, बांधकाम यांची माहिती संकलित करून यावर नियंत्रण ठेवले जाणार आहे. म्युनिसिपल ई-क्लासरुम (E-Classroom) प्रकल्प महापालिकेच्या १२३ शाळांमध्ये राबविला आहे. त्यांतर्गत मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू भाषांचे धडे दिले जात आहे. वर्ग खोल्यांमध्ये स्मार्ट टीव्ही (Smart TV) तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही (CCTV) बसविण्यात आले आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेचा Artificial Intelligence (AI) उपयोग करून विद्यार्थी आणि शिक्षकांवर नजर ठेवली जाणार आहे. शाळांवर नियंत्रण ठेवण्यासाठी इज्युकेशन सारथी (Education Sarthi) सुरू करण्याचे नियोजन आहे. शहरातील ६० पैकी ४७ व्हीएमडी (VMD) कार्यरत आहेत. ९५ टक्के सिटी नेटवर्कचे काम पूर्ण झाले आहे. शहरातील दहापैकी आठ ठिकाणी स्मार्ट पार्किंगचे (Smart Parking) काम पूर्ण झाले असून लवकरच हा प्रकल्प पूर्ण होईल. स्मार्ट पर्यावरण (Smart environment), स्मार्ट वॉटर (Smart Water), स्मार्ट सिव्हरेज (Smart Sewage) , घनकचरा व्यवस्थापन (Solid Waste Management) प्रकल्प देखील प्रगतिपथावर असल्याचे शेखर सिंह यांनी सांगितले.

स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत शहराच्या विकास कामांच्या अनुषंगाने शहर सल्लागार समितीची बैठक पार पडली.यावेळी खासदार श्रीरंग बारणे (MP Srirang Barane), जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (Collector Dr. Rajesh Deshmukh), सह मुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादव (Kiranraj Yadav), मुख्य माहिती आणि तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण (Nilakantha Poman) उपस्थित होते.

या बैठकीत खासदार श्रीरंग बारणे यांनी काही महत्त्वपूर्ण सुचना दिल्या असून, ते म्हणाले आहेत की,
महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.
शाळांमधील स्वच्छता, शौचालये, विद्यार्थ्यांच्या समस्यांकडे लक्ष द्यावे. दिल्ली (Delhi), मुंबई (Mumbai)
प्रमाणे महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा दर्जा (Quality Education) उंचवावा.
शहरातील जास्तीत-जास्त मुलांनी महापालिका शाळांमध्ये (Municipal School) प्रवेश घ्यावा,
यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत. शहरातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करावी, असे मत त्यांनी मांडले आहे. (Pune PCMC News)

Web Title : PCMC News | Pimpri – Chinchwad city on smart city route; CCTV is everywhere in the city

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Devendra Fadnavis | ‘ज्यांच्याकडे पांढार पैसा असेल त्यांना…’, नोटबंदीवर फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं (व्हिडिओ)

ACB Trap News | 20 हजाराच्या लाच प्रकरणी कोपरगावच्या तहसीलदारासह खाजगी व्यक्ती अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

Pune NCP News | पुण्यात राष्ट्रवादीतर्फे आरबीआय कार्यालयासमोर दोन हजार रुपयांच्या नोटेचा श्रद्धांजली कार्यक्रम ! (व्हिडीओ)