PCMC Rapido | पिंपरी चिंचवडमध्ये ‘रॅपिडो’ला ब्रेक, RTO कडून गुन्हा दाखल

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – PCMC Rapido | परवाना नसताना रॅपिडो नावाने बाईक टॅक्सी सेवा पुरवणाऱ्या कंपनीवर पिंपरी चिंचवड मधील भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) याबाबत फिर्याद देण्यात आली आहे. रॅपिडोकडून शहरामध्ये (PCMC Rapido) फेब्रुवारी 2021 पासून बेकायदेशीर अॅपच्या माध्यमातून प्रवासी वाहतूक सुरु होती.

 

याबाबत पिंपरी चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे मोटार वाहक निरीक्षक तानाजी शिवाजी धुमाळ (वय-45 रा. कोथरुड, पुणे) यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात सोमवारी (दि.28) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी पुण्यातील भंडारकर रोड येथील रोपेन ट्रांसपोर्टेशन सर्व्हिसेस प्रा. लि. कंपनी विरुद्ध आयपीसी मोटर वाहन कायदा कलम 66, 192 (अ), 93, 193, 146, 197, व माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

तानाजी धुमाळ यांच्या तक्रारीनुसार, रॅपिडो या कंपनीला महाराष्ट्रात राज्य शासनाने तसेच प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने बाईक टॅक्सी सेवेला कोणताही परवाना दिलेला नाही.
असे असतानाही कंपनीने पिंपरी चिंचवड परिवहन विभागात रॅपिडो (PCMC Rapido) हे बाईक टॅक्सी अॅप विनापरवानगी सुरु केले.
हे अॅप कायदेशीर असल्याचे दुचाकी वाहन चालक व प्रवाशांना भासवून बेकायदेशील प्रवासी वाहतुक करुन
कंपनीने स्वत:चा आर्थिक फायदा करुन घेतल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक पांचाळ करीत आहेत.

 

Web Title :- PCMC Rapido | Another FIR Registered Against Rapido For Operating Illegal Bike Taxi Service

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Chitra Wagh On Sushma Andhare | ‘आमची नावे घेऊन सुषमा अंधारेंचे दुकान चालू आहे’ – चित्रा वाघ

Anshula Kapoor | बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरची बहीण अंशुला कपूर चर्चेत; ‘या’ सेलिब्रिटीला करतेय डेट

Sunny Waghchoure-Golden Boy | बिग बॉस 16 मध्ये एमसी स्टॅनला टक्कर देण्यासाठी पुण्याचा गोल्डन बॉय घेणार एंट्री