Sunny Waghchoure-Golden Boy | बिग बॉस 16 मध्ये एमसी स्टॅनला टक्कर देण्यासाठी पुण्याचा गोल्डन बॉय घेणार एंट्री

पोलीसनामा ऑनलाइन : Sunny Waghchoure-Golden Boy | सध्या टेलिव्हिजनवर बिग बॉस 16 चर्चेत आहे. यामध्ये कधी शिवचे कौतुक होते तर कधी अर्चनावर प्रेक्षक भडकतात तर सध्या सुबनुल तर चर्चेतच आहे. अशातच पुन्हा एकदा बिग बॉस 16 सर्वांचेच लक्ष वेधून घेण्यासाठी सज्ज झाले आहे. आता वाईल्ड कार्ड एंट्री घेत घरात एक अतरंगी सदस्य एन्ट्री घेणार आहे. सनी नानासाहेब वाघचौरे ज्याला गोल्डन बॉय म्हणून ओळखले जाते. आता लवकरच बिग बॉस 16 मध्ये जाण्यासाठी सज्ज झाला आहे. सध्या त्याची पोस्ट सोशल मीडियावर वायरल होताना दिसत आहे. (Sunny Waghchoure-Golden Boy)

सनी नानासाहेब वाघचौरे हा महाराष्ट्रातलाच मुलगा असून तो पुण्याचा स्थायिक आहे. सोनं परिधान करायला त्याला प्रचंड आवडतं. नेहमीच तो सोन्याने भरलेला दिसतो. त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून बिग बॉस मध्ये जात असल्याचं सांगितल्याने सध्या प्रेक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तो घरातील एमसी स्टॅन ला टक्कर देणार असल्याचे देखील म्हटले जात आहे. (Sunny Waghchoure-Golden Boy)

गोल्डन बॉय सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो. एवढेच काय तर इंस्टाग्राम वर त्याचे 1.6 मिलियन फॉलोवर्स देखील आहेत. किती तरी किलोचे सोने तो अंगावर घालून फोटोज आणि व्हिडिओज नेहमीच शेअर करत असतो. आता बिग बॉसच्या घरात एमसी स्टॅन ला टक्कर देण्यासाठी तो सज्ज झाला आहे. एमसी स्टॅन हा करोडोंची ज्वेलरी कॅरी करत आहे. आता या गोल्डन बॉय च्या एंट्रीने घरात नवीन काय पाहायला मिळणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

एवढेच नाही तर हा गोल्डन बॉय महाराष्ट्रातील असल्याने तो शिव ठाकरे प्रमाणेच महाराष्ट्राच्या मातीतला आहे.
यामुळे घरात आता एक नाही तर दोन व्यक्ती महाराष्ट्रातल्या मातीतले असणार आहेत.
तर महाराष्ट्रातली जनता नक्की कोणाला जास्त प्रेम देईल हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.

Web Title :- Sunny Waghchoure-Golden Boy | bigg boss 16 wild card entry sunny waghchoure golden boy from pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Eknath Khadse | ‘मग एवढे दिवस तुझी जबान चूप का राहिली?’ एकनाथ खडसेंनी गिरीश महाजनांना एकेरी भाषेत सुनावलं

Chhagan Bhujbal | “सध्याच्या स्त्रियांचे, समाजाचे आणि शिक्षण व्यवस्थेचे आदर्श चुकलेत” -छगन भुजबळ