सावधान ! तुमच्या WhatsApp ‘फेसबुक’ आणि ‘गुगल’चा डेटा चोरू शकते ‘हे’ नवीन टूल !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – डेटा हॅकिंगच्या दृष्टीने एक महत्वाची बातमी समोर आली आहे. यावर्षी व्हॅट्सऍपमध्ये Pegasus नावाचा व्हायरस असल्याची माहिती समोर आली होती. ज्याद्वारे मोबाईल फोन ट्रॅक करून तुमची महत्वाची माहिती सहजरित्या चोरी केली जाऊ शकते. मात्र या व्हायरस इजराईल च्या एका कंपणीने स्पायवेयर तयार केला आहे. सायबर इंटेलीजेंस मध्ये काम करणारी कंपनी एनएसओ ने हा व्हायरस तयार केला आहे.

एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार याचे अपडेटेड व्हर्जन आले असून ते खूप खतरनाक आहे. कंपनीने बनवलेले हे एक पावरफुल टूल असून याद्वारे युझरच्या क्लाउड बेस्ड अकाउंटला ऍक्सेस करून त्याचा डेटा चोरी केला जाऊ शकतो. मिळालेल्या माहितीनुसार गुगल, फेसबुक, माइक्रोसॉफ्ट त्याचबरोबर अमेझॉनवरील देखील माहिती या व्हायरसद्वारे चोरी केला जाऊ शकते. इतकेच नाही तर Apple iCloud वरील डेटा देखील यामुळे चोरी करता येऊ शकतो. त्यामुळे तुमचा लोकेशन डेटा, फोटो, मॅसेज त्याचबरोबर इतर महत्वाची माहिती देखील चोरी केली जाऊ शकते. हा व्हायरस इतका खतरनाक असून तुमचा ऑथेन्टिकेशनचा कालावधी संपल्यानंतर देखील हा व्हायरस युझरच्या अकाउंटवर प्रभाव करतो.

दरम्यान, हा टूल Android आणि iPhone या दोन्ही व्हर्जनमध्ये चालतो. कॉम्पुटर, लॅपटॉप असो किंवा स्मार्टफोन सर्वांचा डेटा हा व्हायरस ऍक्सेस करत असून तुमचा डेटा चोरला जातो.

एनएसओ ने दिली सफाई
आजच्या या टेक्नॉलॉजीच्या युगात दहशतवादी संघटना आणि गुन्हेगार आपले जिन्हें लपवण्यासाठी अशा प्रकारचा व्हायरसचा किंवा एनक्रिप्टेड टेक्नॉलजीचा वापर करत असतात. यामुळे कंपनीने हा व्हायरस तयार केला असून हे गुन्हेगार या पद्धतीने राष्ट्राची सुरक्षा धोक्यात घालून या प्रकारे माहिती चोरत असतात. त्यामुळे दहशतवाद्यांचा तपास करण्यासाठी किंवा गुन्हेगाराचा शोध घेण्यासाठी जबाबदार देशांनाच फक्त हे सॉफ्टवेयर विकले जाणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त –