अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून ‘या’ नेत्यानी घेतली शपथ

ईटानगर : वृत्त संस्था – भाजपचे वरिष्ठ नेते पेमा खांडू यांनी बुधवारी अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. गव्हर्नर ब्रिगेडियर (सेवानिवृत्त) बी.डी. मिश्रा यांनी दोरजी खांडू कन्व्हेन्शन सेंटर येथे पेमा खांडू यांना मुख्यमंत्री आणि गोपनीयतेची शपथ दिली. त्यासोबतच चोवंना मेन सह मंत्रिमंडळाच्या 11 मंत्र्यांनी शपथ घेतली. खांडू यांनी अरुणाचल प्रदेशचे 10 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. या शपथग्रहण सोहळ्याला आसाम, नागालँड, मणिपुर, त्रिपुरा आणि मेघालयचे मुख्यमंत्री उपस्थित होते. खांडू यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने 60 सदस्यीय विधानसभेत 41 जागा जिंकल्या आहेत.

भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी पेमा खंडू यांना ट्विटरद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. अमित शहा यांनी ट्विटरवर लिहले आहे की, अरुणाचल प्रदेशच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याने पेमा खांडू यांना शुभेच्छा.अरुणाचल प्रदेशमधील लोकांनी भाजपवर विश्वास दाखविल्याबद्दल मी आभार मानतो. मला खात्री आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री पेमा खांडू राज्य प्रगतीच्या नवीन उंचीवर आणतील.