पेन्शनधारकांसाठी खुशखबर ! मोदी सरकारनं दिलं मोठं गिफ्ट, 60 रूपये देऊन घरबसल्या मिळवा ‘ही’ खास सुविधा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सरकारने पेन्शनधारकांना मोठी भेट दिली आहे. कार्मिक, सार्वजनिक तक्रार व निवृत्ती वेतन मंत्रालयाने पेन्शन वितरित बँकांना 30 नोव्हेंबरपर्यंत त्यांचे प्रमाणपत्र सादर न केलेल्या पेन्शनधारकांकडून जास्तीत जास्त 60 रुपये शुल्क आकारून त्यांच्या घरी ही सुविधा देण्याच्या सूचना दिल्या आहेत. यासंदर्भात 17 जानेवारी 2020 रोजी परिपत्रक देण्यात आले आहे. दरवर्षी सरकारी पेन्शनधारकाने नोव्हेंबरमध्ये आपले अस्तित्व प्रमाणपत्र बँकेत जमा करावे जेणेकरुन त्यांची पेन्शन थांबणार नाही.

सर्व पेंशनधारकांनी जीवन प्रमाणपत्र सादर केले जावे या उद्देशाने मंत्रालयाने बँकांना दरवर्षी 1 डिसेंबरला जीवन प्रमाणपत्र सादर न करणाऱ्यांची यादी तयार करण्यास सांगितले आहे. एसएमएस व ईमेलद्वारे जीवन प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या निवृत्तीवेतनधारकांना आठवण करून देण्यासाठी बँकेला सांगण्यात आले आहे. मेसेज किंवा मेल पाठविण्याबरोबरच बँकेला विचारणे आवश्यक आहे की तुम्हाला घरी जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची सुविधा हवी आहे का?

24 ऑक्टोबर, 1 नोव्हेंबर, 15 नोव्हेंबर आणि 25 नोव्हेंबर रोजी बँका पेन्शनधारकांना एसएमएस / ईमेल पाठवून आठवण करून देतील. मागील वर्षी, 18 जुलै 2019 रोजी केंद्र सरकारने 80 वर्षांवरील पेन्शनधारकांना त्यांचे जीवन प्रमाणपत्र 1 नोव्हेंबरऐवजी 1 ऑक्टोबरला सादर करण्यासाठी परिपत्रक जारी केले होते.