Bihar Election Results : ‘बिहारच्या जनतेनं पुन्हा एकदा केवळ आश्वासनं आणि जातीयवादाच्या राजकारणाला नाकारलं’

ADV

पाटणा : पोलिसनामा ऑनलाइन – बिहार निवडणुकीत भाजप मोठा पक्ष ठरला असून, अनपेक्षित असे यश मिळाले आहे. निवडणुकीच्या निकालानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून बिहारमध्ये विकास, प्रगती आणि सुशासन यांची पुन्हा निवड करण्यासाठी मी बिहारच्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. बिहारच्या जनतेने पुन्हा एकदा पोकळ आश्वासनं आणि जातीयवादाच्या राजकारणाला नाकारत एनडीएच्या विकासवादाची निवड केली, असं ट्विट करत विरोधकांवर निशाणा त्यांनी साधला आहे.

ट्विटमध्ये ते म्हणाले की, या निवडणुकीमध्ये जनतेने ज्या उत्साहानं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एनडीएच्या धोरणांना समर्थन दिलं ते नक्कीच उल्लेखनीय आहे. या निकालामुळे मोदी सरकारच्या कोरोनाविरुद्धच्या यशस्वी लढाईत गरीब, मजूर, शेतकरी आणि तरुण वर्गाचा विश्वास दिसून आलाच, पण त्याचबरोबर देशाची दिशाभूल करणाऱ्यांनाही धडा मिळाला आहे.
बिहारमध्ये विकास, प्रगती आणि सुशासन यांची पुन्हा निवड करण्यासाठी मी बिहारमधील सर्वांचे आभार मानतो. मुख्यत: बिहारचे तरुण आणि महिलांना धन्यवाद देतो, ज्यांनी बिहारची सुरक्षा आणि उज्ज्वल भविष्यासाठी एनडीएला बहुमत मिळवून दिलं आहे, असं अमित शहा यांनी म्हटलं आहे.

ADV

बिहारमध्ये मतदारांनी एनडीएला चौथ्यांदा पसंती दर्शवली आहे. यापूर्वीच्या काळात नितीश कुमार यांनी भाजपच्या जोरावर सत्ता मिळवली, पण कधीही त्यांना लहान भाऊ समजले नाही. मात्र या निवडणुकीत भाजपने ७४ जागा मिळवल्या आहेत. पहिल्यांदाच भाजप बिहारमध्ये सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. आत्तापर्यंतच्या काळात नितीश कुमार यांच्या हातात सत्तेच्या चाव्या होत्या. मात्र, यावेळी जदयूला ४३ जागा मिळाल्या आहेत, त्यामुळे सत्तेची गणिते बदलण्याची शक्यता राजकीय जाणकारांनी वर्तवली आहेत.