परभणीत ‘हिंदुह्रदयसम्राटांच्या’ प्रतिमेला आभिवादन 

परभणी : पोलीसनामा ऑनलाईन – हिंदुह्रदयसम्राट अशी आपली ओळख निर्माण करून गेलेले शिवसेनेचे प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज सहावी पुण्यतिथी त्यांच्या स्मृती जपण्याचा आणि त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौक, परभणी येथे “वंदनिय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे” यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.

यावेळी माजी विरोधी पक्ष नेत्या अंबिका डहाळे, उपजिल्हाध्यक्ष संजय गाडगे, शहर प्रमुख ज्ञानेश्वर पवार,  माजी शहर प्रमुख अनिल डहाळे, नवनीत पाचपोर, उपशहरप्रमुख मारोती तिथे, राहुल खटींग, अस्लम शेख,  युवासेना शहरप्रमुख विशू डहाळे, बाळराजे तळेकर. गजानन शहाणे आदी शिवसेना – युवासेना  पदाधिकारी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना उपशहरप्रमुख तुषार चोभारकर, संदीप पांगारकर, मकरंद कुलकर्णी यांनी केले.

बाळासाहेब ठाकरे यांचे १७ नोव्हेंबर २०१२ रोजी हृदयाची प्रक्रिया बंद पडल्याने दुपारी ३ वाजून ३३ मिनिटांनी निधन झाले होते.  त्यांच्या जाण्याने उभा महाराष्ट्र हळहळला होता त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी १८ नोव्हेंबर २०१२ रोजी लाखोंचा जनसागर मुंबईच्या रस्त्यावर अवतरला होता. बाळासाहेब हे स्पष्ट आणि झंझावाती नेते असल्याने सामान्य लोक त्यांच्या व्यक्तिमत्वाचे दिवाने होते त्यांनी आयुष्यभर एक हि निवडणूक लढवली नसताना त्यांना लोकांनी दिलेले प्रेम हे शब्दात सामावणारे नाही त्यांच्या जाण्याने एक लोक नायक हरपल्याची भावना जनमानसात पसरली होती अगदि तेव्हापासून आजपर्यंत बाळासाहेबांच्या स्मृती जपण्याचा प्रयत्न सर्व सामान्य लोक करत असतात.

बाळासाहेब ठाकरे यांच्यावर शिवाजी पार्कमध्ये  ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले होते त्या ठिकाणीही बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आजच्या दिवशी हजारो लोक एकत्रित येत असतात. तसेच शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे त्यांच प्रमाणे शिवसेनेचे असंख्य शिवसैनिक नेते आणि कार्यकर्ते शिवाजी पार्कच्या मैदानात एकत्र येत असतात. गत वर्षी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हि बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी शिवाजी पार्कवर आले होते.

नेटीजनवर बाबासाहेबांच्या पुण्यस्मरणाबद्दल भरभरून लिहले जाते आहे. बाळासाहेबांच्या जीवनाची किस्से , बाळासाहेबांच्या वरील कवितांनी फेसबुकवर  बाळासाहेबांच्या अभिवादनाचा अक्षरशः महापूर आल्याचे बघायला मिळते आहे. यावरूनच मराठी माणसाच्या मनात बाळासाहेबांबद्दल आजही अपार प्रेम आहे हे दिसून येते. माणूस देह रूपाने या जगाचा निरोप घेऊन गेला तरी माणसे त्याला आठवणींच्या रूपाने जिवंत ठेवतातच फक्त त्याचे कार्य समाजासाठी असले पाहिजे. बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यात त्यांनी केलेला संघर्ष आणि त्या संघर्षातून उभा केलेला समाज सर्व सामन्यांना भावतो. आज बाळासाहेब असते तर हे असे झाले असते, आज बाळासाहेब असते तर हे असे झाले नसते या बोलल्या जणाऱ्या वाक्यातून बाळासाहेबांचे महत्व राज्यांच्या राजकारणात किती होते या भावानेतून नेहमी व्यक्त होत राहते.