‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’ : फेसबुकवर खोट्या बातम्या पसरवण्यात वृद्ध आघाडीवर  

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – फेसबुकच्या हे संवादाचे प्रभावी माध्यम आहे.  परंतु या  फेसबुकच्या माध्यमातून खोट्या बातम्या पसरवण्याचे प्रकार घडत आहे. फेसबुकवर खोट्या बातम्या पसरवण्यात तरुणांपेक्षा ६५ वर्षावरील वृद्ध व्यक्तींची संख्या अधिक आहे.  १८ ते २९ या वयोगटातील तरुणांनी केवळ ३ टक्के खोट्या बातम्या फेसबुकवर शेअर केल्या होत्या ,अशी धक्कादायक माहिती एका सर्व्हेतून समोर आली आहे.
न्यूयॉर्क विद्यापीठ आणि प्रिंसटन विद्यापीठाने केलेल्या एका सर्व्हेतून ही माहिती समोर आली आहे. अमेरिकेत २०१६ साली राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू होती. या काळात फेसबुकवर खोट्या बातम्या मोठ्या प्रमाणात पसरवल्या जात होत्या. त्यावेळी केलेल्या या सर्व्हेतून ही माहिती उघड झाली आहे. ६५ वर्ष व त्यापेक्षा अधिक असलेले वयोवृद्ध लोक खोट्या बातम्या फेसबुकवर शेअर करण्यात पटाईत असल्याचे उघडकीस आले आहे. ६५ वर्षावरील अधिक वृद्धांनी १८ ते २९ या वयोगटातील तरुणांच्या तुलनेत ५ पट अधिक खोट्या बातम्या फेसबुकवर पसरवल्या आहेत, असे या अभ्यासातून समोर आले आहे.
फेसबुकवर वृद्ध लोकांनी खोट्या बातम्या पसरवल्या असल्या तरी या बातम्यांना अपेक्षित असे यश मिळालेले नाही, असेही या सर्व्हेत म्हटले आहे. वृद्ध व्यक्तीकडून पसरवण्यात येत असलेल्या खोट्या बातम्या ओळखण्यासाठी आपल्याला नवीन उपाय शोधावा लागेल, असे प्रिंसटन विद्यापीठातील सहायक प्राध्यापक अँड्र्यू गेस यांनी सांगितले.
सोशल मीडियातील फेसबुक हे प्रभावी माध्यम आहे. फेसबुकच्या माध्यमातून हजारो-लाखो लोकांकडे पोहोचता येते. परंतु, गेल्या काही दिवसांपासून फेसबुकवर खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत. खोट्या बातम्यामुळे दंगल होऊन काही लोकांना आपला जीवही गमवावा लागला आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us