बकरी ईदच्या दिवशी काश्मीरात पाकिस्तान आणि आयसिसचे झेंडे फडकवत पोलिसांवर दगडफेक

जम्मू-काश्मीरः वृत्तसंस्था

देशभरात उत्साहपूर्ण वातावरणात बकरी ईद साजरी केली जात असताना, जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरमध्ये मात्र आंदोलकांकडून सुरक्षा दलावर तुफान दगडफेक करण्यात येत आहे. एवढेच नाही तर काही आंदोलकांनी पाकिस्तान आणि आयसिस या दहशतवादी संघटनेचे झेंडे देखील फडकवले. जमावामध्ये युवकांचा मोठ्याप्रमाणात सहभाग असून हे युवक बेभान होवून सुरक्षा दलावर दगडफेक करत आहेत.
[amazon_link asins=’B078BNQ313′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’cfbe1f15-a5e4-11e8-92ed-258120dc7df7′]
जमावावर नियंत्रण मिळविण्यासाठी सुरक्षा दलाकडून प्रयत्न सुरू आहेत. काश्मीरमध्ये आयसिस आणि पाकिस्तानचे झेंडे फडकविण्याची ही काही पहिलीच वेळ नसून, यापूर्वी देखील असा प्रकार करण्यात आला आहे. दरम्यान अनंतनाग येथेही आंदोलकांनी पोलिसांच्या पेट्रोलिंग गाड्यावर दगडफेक केली. अनंतनाग येथे तणावाचे वातावरण आहे. कुलगाम परिसरात दहशतवाद्यांनी एका पोलिसाला ठार केले आहे.

बकरी ईद निमित्त बुधवारी सकाळी श्रीनगर येथे नागरिक जमले होते. त्याचवेळी काही आंदोलक देखील त्या ठिकाणी एकत्र आले आणि त्यांनी बंदोबस्तासाठी असलेल्या सुरक्षा दलावर दगडफेक करण्यास सुरूवात केली. त्याच वेळी काही तरुणांनी आपल्या हातामध्ये आयसिस आणि पाकिस्तानचे झेंडे घेतले होते. ते सुरक्षा रक्षकांना दाखवत त्यांना चिडवण्याचा प्रयत्न केला. तसेच कुलगाम येथील झाजरीपुरा येथे ईदगाहच्या बाहेर दहशतवाद्यांनी एका पोलिसावर गोळीबार केला असून, यामध्ये त्या पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याचे म्हटलं जात आहे. मात्र याबाबतची अधिकृत माहिती अद्याप समजू शकलेली नाही.