भ्रष्टाचार आणि मुजोरीकणाऱ्यांना जनता धडा शिकवेल : पाराजी हंडाळ

दौंड : पोलीसनामा ऑनलाईन

प्रत्येक कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार करून आपले कृष्णकृत्ये लपविण्यासाठी मोठी दहशत माजवणाऱ्यांविरोधात आता जनता पेटून उठली असून यावेळी केडगावच्या परिपूर्ण विकासासाठी जनताआम्हाला साथ देईल असा विश्वास केडगावचे माजी सरपंच पाराजी हंडाळ यांनी व्यक्त केला. ते केडगाव ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे उमेदवार गिरीराज कांबळे यांच्या प्रचारार्थ आयोजित कोपरासभेत बोलत होते.

केडगाव ग्रामपंचायतीचा कारभार पाहता येथे मोठ्याप्रमाणावर भ्रष्टाचार झाला असल्याचे विविध प्रकारणांवरून समोर आले आहे. ज्यांनी मागील पाच वर्षांपूर्वी मोठा भ्रष्टाचार करून विकास कामांनाच वेठीस धरले होते आणि केडगावची संपूर्ण जनता अश्यालोकांविरुद्ध एकवटली होती अश्या लोकांनाच विरोधकांनी आपल्या सोबत घेऊन नवीन पॅनेल उभा करून एक प्रकारे आपली खरी ओळख जनतेसमोर आणली आहे. गावातील प्रत्येक कामामध्ये स्वतःचा मोठेपणा गाजविण्यासाठी कोण दहशत करत होते, कुणी फंड रोखून धरले होते आणि लोकांना स्वतःच्या विभागात आलेल्या फंडांसाठी कोणी वेठीस धरले होते हे जनतेला चांगलेच माहीत आहे. धाक, दपटशाही करून गोरगरीब जनतेला ज्यांनी त्रास दिला अश्यांना आता परिणाम भोगावे लागणार आहेत.  निवडणुका जवळ आल्या कि हाथ जोडायचे आणि निवडून आले कि हाथ उचलायचे हाच यांचा खरा चेहरा असून मतांसाठी ज्या नागरिकांना यांनी हाथ जोडले होते त्याच नागरिकांवर हाथ उचलून यांनी खोटे गुन्हे दाखल केले हे जनता विसरली नसल्याचे असे सांगत रमेश थोरात यांच्या नेतृत्वाखाली उभ्या असलेल्या सहकार परिवर्तन पॅनेलच्या सरपंचासह सर्व उमेदवारांना जनता निवडून देईल असा विश्वास व्यक्त केला.