Periods | मासिक पाळी दरम्यान शरीर स्वच्छ ठेवा, इथूनच होते इंफेक्शनची सुरूवात, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम (Policenama online) – मासिकपाळी (Periods) ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे ज्यातून प्रत्येक महिलेला जावे लागते. मासिक पाळीचा कालावधी (Periods) चार-पाच दिवसांचा असतो याकाळात महिलांनी स्वच्छतेची विशेष काळजी घेणे महत्त्वाचे असते. कारण जर मासिकपाळीच्या काळात स्वच्छता राखली गेली नाही तर बर्‍याच आजारांचा धोका असतो.

अजूनही महिलांमध्ये मासिकपाळीच्या स्वच्छतेबद्दल जागरूकता अभाव आहे. मासिक पाळीवर स्त्रिया अगदी मोकळेपणाने बोलण्यास संकोच करतात. यासंदर्भातील स्वच्छता आणि समस्यांबद्दल खुलेपणाने बोलले पाहिजे जेणेकरून समस्या वेळेवर थांबू शकेल.

प्रत्येक महिलेने मासिकपाळी दरम्यान अशाप्रकारे काळजी घेतली पाहिजे…

1) मासिकपाळी दरम्यान स्वच्छ अंडरवेअर घालणे गरजेचे आहे तसेच ती सुती असणे गरजेचे आहे. अन्यथा पुरळांची समस्या उद्भवू शकते. अतिरिक्त अंडरवेअर आपल्याबरोबर ठेवा. जर डाग पडला असेल तर ते त्वरित बदला.

2) खराब झाल्यास एकदा त्यांना डिटॉलच्या पाण्यातून काढा.

3) आजही बर्‍याच महिला कपड्याचा वापर करतात. आपणही जर कपड्याचा वापर करत असाल तर ते कापड सुती असणे गरजेचे आहे. एकदा कापड वापरल्यानंतर पून्हा तेच कापड वापरू नका.

4) जर आपण पॅड वापरत असाल तर ते सहा ते आठ तासांच्या आत बदला. जर जास्त रक्तस्त्राव होत असेल तर लवकर बदला. घाणेरडे आणि ओलसर पॅड संसर्ग निर्माण करू शकतात.

5) सॅनिटरी नॅपकिनचा वापर केल्यावर ते योग्यरित्या काढून टाका आणि डस्टबीन मध्ये टाका.

6) आपल्या पिशवीत अतिरिक्त सॅनिटरी नॅपकिन्स, टिश्यू पेपर, हँड सॅनिटायझर ठेवा.

7) काही महिलांना मासिकपाळी दरम्यान थकवा जाणवतो.
यासाठी कोमट पाण्यात मीठ टाकून ती आंघोळ करू शकते.
यामुळे शारीरिक थकवा दूर होतो.

Web Titel :- Periods | keep the body clean during the days of periods

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Lightning | वीज कोसळल्याने देशात 78 लोकांचा गेला बळी; पीएम मोदींनी केली आर्थिक मदतीची घोषणा

Smartphone | जर तुमची मुले सुद्धा जास्त मोबाइल पहात असतील तर ‘या’ 6 टिप्सचा करा वापर, जाणून घ्या

Thane Crime News | धक्कादायक ! चक्क रक्ताचा टिळा लावून केला प्रेमाचा बनाव, विवाहित तरूणाचे युवतीवर लैंगिक अत्याचार