‘उचकी’ येणं देखील ‘कोरोना’चं लक्षण असू शकतं ? अमेरिकेतील डॉक्टरांनी केला खुलासा

पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाचे काही लक्षणे आपल्याला माहिती आहेत. त्यात सामान्यपणे ताप येणे, गळा सुजणे, श्वसनास अडथळा वाटणे, जास्तीचा घाम येणे इत्यादी लक्षणे आहेत. आता तज्ञाचं म्हणणं आहे की, उचकी येणे हे सुद्धा कोरोनाचे लक्षण असू शकते.

अमेरिकतील जर्नल ऑफ इमर्जंसी मेडिसीनच्या रिपोर्ट मध्ये असा दावा केला आहे. रिपोर्टनुसार एका ६२ वर्षीय रुग्णाला सलग चार दिवस उचकी आल्यानंतर कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आले आहे. कुकी काउंटी हेल्थ च्या डॉक्टरांनी सांगितले की, शिकागोतल्या एका व्यक्तीला सुरूवातीला कोणतीच लक्षणे नव्हती. उचक्या शिवाय दुसरे कोणताही आजार या व्यतिला नव्हता. सिटी स्कॅन केल्यानंतर आढळलं की फुफ्फूसांमध्ये सूज आहे. याआधी ही व्यक्तीला फुफ्फूसांचा आजार ही नव्हते.

यानंतर या व्यक्तिला ताप सुद्धा आला. याच दरम्यान कोरोना चाचणी केली असता रिपोर्ट पॉझिटीव्ह आले. डॉक्टरांचं म्हणणं होतं की, सिटी स्कॅन नंतर फुफ्फूसांमध्ये सूज दिसून आली. ही सूज सततची उचकी लागून आल्याचे डॉक्टरांनी सांगितले. कोरोना रूग्णाचे हे पहिलेच उदाहरण की उचकी लागल्यामुळे इमर्जंसी वॉर्ड ला दाखल व्हावे लागले. दवाखान्यात या रुग्णाला सेटरियाक्सोन, हायड्रोक्सीक्लोरोक्वीन, आणि एजिथरोमाइसिन द्यावे लागले आहे. तीन दिवसानंतर रुग्णाला घरी सोडण्याच्या स्थितीत आणले गेले. तज्ञाचं म्हणणं आहे ४८ तासानंतरही उचकी थांबत नसल्यास डॉक्टरांशी संपर्क साधायला हवे.