बारमध्ये चित्रिकरण केल्याने नग्न करून चोपले

ADV

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बारमध्ये मद्यप्राशन करताना मोबाईलवर शुटींग करणे तमाशातील ढोलकीपट्टूला चांगलंच महागात पडलं. शुटींग केली म्हणून बारमालक आणि त्याच्या कर्मचाऱ्यांनी शुटींग करणाऱ्याला नग्न करून मारहाण केली. एवढंच नाही तर बारमालकाने त्याचा व्हिडीओ करून सोशल मिडीयावर व्हायरल केला. हा प्रकार चेंबूरमधील एका बारमध्ये घडला.

याप्रकरणी बारमालक व त्याच्या कर्मचाऱ्यांवर चेंबूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. यातील बारच्या कर्मचारी अब्दुल अजीज याला अटक कऱण्यात आली आहे.

ADV

गोवंडी परिसरात राहाणाऱ्या ४५ वर्षीय व्यक्तीने यासंदर्भात तक्रार दिली आहे.

तक्रादार हा प्रसिद्ध तमाशात ढोलकी वाजवतो. त्याला दारूचे व्यसन आहे. त्यामुळे तो बारमध्ये मद्यप्राशन करण्यासाठी चेंबुरमधील राम पंजाब बारमध्ये दररोड जात होता. १६ फेब्रुवारी रोजी तो बारमध्ये मद्यप्राशन करत असताना मोबाईलवरून बारमधील प्रकार चित्रित करत होता. त्यावेळी ही बाब बारच्या मॅनेजरला लक्षात आला. त्याने आणि त्याच्या कर्मचाऱ्यांनी मारहाण करत त्याच्याकडील मोबाईल काढून घेतला. दुसऱ्या दिवशी १७ फेब्रुवारीला तो पुन्हा मोबाईल घेण्यासाठी सायंकाळी बारमध्ये गेला. त्यावेली बारचा मॅनेजर जगदीश शेट्टी, बार चालविणारा सुखदेव पाटील आणि तेथे काम करणारा कर्मचारी अब्दुल अजीज यांनी त्याला अंगावरील कपडे काढून मारहाण केली. त्याचा मोबाईलमध्ये व्हीडीओ केला. त्यानंतर तक्रारदाराने याची माहिती आपले कुटुंबिय व मित्रांना दिली. तसेच २० फेब्रुवारी रोजी चेंबूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.