मराठा मोर्चा विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाजाकडून महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. या बंदला पुण्यासह राज्यात हिंसक वळण लागून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्यात आले. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात मराठा मोर्चाच्या विरोधात एक याचिका दाखल करण्यात आली आहे.
[amazon_link asins=’B077Q19RF9′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a7736d65-9bdc-11e8-b9c2-8bb4a49b4464′]

मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली याचिका शेतकरी द्वारकानाथ पाटील यांनी दाखल केली आहे. पाटील यांनी याचिका दाखल करताना दोन मुख्य मागण्या केल्या आहेत. यामध्ये मोर्चावर प्रतिबंध घालावा आणि बंद, मोर्चादरम्यान झालेले सार्वजनिक मालमत्तेची नुकसान भरपाई त्यांच्याकडून करुन घ्यावी. तसेच आंदोलनादरम्यान सार्वजनीक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी याचिका द्वारकानाथ पाटील यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे. पाटील यांनी दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी येत्या सोमवारी (दि.१३) होणार असल्याचे पाटील यांचे वकिल आशिष गिरी यांनी सांगितले आहे.

मराठा मोर्चाने पुकारलेल्या बंदला आज राज्यासह पुण्यात हिंसक वळन लागले. पुण्यामध्ये जिल्हाधीकारी कार्य़ालयाची तोडफोड केली. तर चांदणी चौकात आंदोलन कर्त्यांकडून पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. यामध्ये काही पोलीस कर्मचारी जखमी झाले. त्यामुळे पोलिसांना लाठीचार्ज करुन अश्रृधूराचा वापर करावा लागला. तर पुणे- मुंबई द्रुतगती महामार्ग आंदोलन कर्त्यांनी रोखून धरला होता. आदोलन कर्त्यांनी महामार्ग सहा तास रोखून धरला होता.