Petrol Diesel Price Today : पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत 20 दिवसांपासून झाला नाही बदल, आता स्वस्त होईल का?

ADV

मुंबई : पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये आज लागोपाठ 20व्या दिवशी सुद्धा कोणतीही वाढ झाल्याचे दिसून आले नाही. देशाच्या राजधानीसह सर्व महानगरांमध्ये भाव स्थिर आहेत. यापूर्वी मागील महिन्यात एकुण 14 दिवस पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढले होते. ज्यामुळे जवळपास सर्व शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या किंमती ऑल टाइम हायवर पोहचल्या. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरावर अर्थमंत्री निर्मला सीमारामन, आरबीआय गव्हर्नर शक्तिकांता दास यांच्यापासून पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यापर्यंत सर्वांनी इंधनाच्या वाढत्या किंमतींमुळे चिंता व्यक्त केली आहे.

जीएसटीच्या कक्षेत आणल्यास कमी होईल किंमत
मागील आठवड्यात अर्थमंत्र्यांनी हा सल्ला सुद्धा दिला होता की, पेट्रोलियम प्रॉडक्ट्स जीएसटीच्या कक्षेत आणले पाहिजेत आणि यावर जीएसटी कौन्सिलमध्ये चर्चा झाली पाहिजे. अशावेळी जर पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणले तर किंमतीत सुमारे 25 रुपयांपर्यंतची घसरण दिसून येऊ शकते.

ADV

पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार का
सरकारने पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्याची मागणी केली आहे. या मागणीनंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे की, जर पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत आले तर यामुळे केंद्र आणि राज्य दोन्ही सरकारांना फायदा होईल. याशिवाय दिल्लीचे गृहमंत्री सत्येंद्र जैन यांनी विधानसभेत म्हटले की, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पेट्रोल-डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणण्याची मागणी यापूर्वी केली आहे.

दिल्लीमध्ये सध्या पेट्रोल 91.17 रुपये आणि डिझेल 81.47 रुपये प्रति लीटर आहे. तर मुंबईत पेट्रोल 97.57 रुपये आणि डिझेल 88.60 रुपये प्रति लीटर आहे.