कोरोना काळाच्या 15 महिन्यात 23 रुपयांनी महागले पेट्रोल-डिझेल, जाणून घ्या सरकार किती वसूल करतंय ‘टॅक्स’

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाआपल्या देशात कोरोनाचा परिणाम मागील वर्षाच्या सुरूवातीपासून दिसण्यास सुरूवात झाली होती. संसर्ग रोखण्यासाठी सरकारने संपूर्ण देशात 25 मार्चला पूर्ण लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला. लॉकडाऊनचे पूर्ण 14 महिने झाले आहेत, आणि या 14 महिन्यात अनेक गोष्टी बदलल्या आहेत. एकीकडे कोरोना संसर्गाने आणि दुसरीकडे महागाईने सर्वसामान्यांची कंबर मोडली आहे.(petrol)

पेट्रोल (petrol) -डिझेलच्या रेट बाबत बोलायचे तर 15 महिन्यातच पेट्रोल petrol 23 रुपये प्रति लीटर महागले आहे. अशाच प्रकारे खाद्यतेल सुद्धा चांगलेच महागले आहे. 2 मार्च 2020 ला पेट्रोलचा रेट 71.49 रुपये तर डिझेलचा भाव 64.10 रुपये प्रति लीटर होता.

जाणून घ्या सरकार किती वसूल करत आहे टॅक्स
7 वर्षापूर्वी पेट्रोलच्या petrol किरकोळ किंमतीत सुमारे दोन तृतीयांश भाग कच्च्या तेलाचा असायचा. आज जवळपास इतकाच भाग केंद्र आणि राज्यांच्या टॅक्सेसचा झाला आहे. आकड्यांवरून समजते की, पेट्रोलवर केंद्र सरकार राज्यांपेक्षा जास्त टॅक्स घेत आहे. सरासरी पाहिले तर राज्य सरकारे प्रत्येक लीटरवर सुमारे 20 रुपयांचा टॅक्स घेत आहेत, तर केंद्र सरकार सुमारे 33 रुपये प्रति लीटर. राज्य सरकारांकडून पेट्रोल-डिझेलवर लावलेला विक्री कर किंवा वॅट प्रत्येक राज्यात वेगवेगळा असतो.

13 वेळा वाढवली एक्ससाईज ड्यूटी
सध्या केंद्र सरकार प्रति लीटर पेट्रोलवर v बेसिक एक्साईज, सरचार्ज, अ‍ॅग्री-इन्फ्रा सेस आणि रोड/इन्फ्रा सेस च्या नावावर एकुण 32.98 रुपये वसूल करते. डिझेलसाठी हे 31.83 रुपये प्रति लीटर आहे. आतापर्यंत सरकारने 13 वेळा एक्साईज ड्यूटी वाढवली आहे. पेट्रोल आणि डिझेलवर मे 2020 मध्ये पेट्रोलवर 13 रुपये आणि डिझेलवर 16 रुपये प्रति लीटर सरचार्ज अखेरचा वाढवला होता.

निम्म्या होऊ शकतात किंमती
जर केंद्र सरकारने पेट्रोलियम petrol उत्पादनांना गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स (जीएसटी) च्या कक्षेत आणले तर सामान्य माणसाला दिलासा मिळू शकतो. जर पेट्रोलियम उत्पादनांचा जीएसटीत समावेश केला, तर देशभरात इंधनाच्या किमती समान राहतील. इतकेच नव्हे, जर जीएसटी परिषदेने कमी स्लॅबचा पर्याय निवडला, तर किंमती कमी होऊ शकतात. सध्या, भारतात चार प्राथमिक जीएसटी दर आहेत. – 5 टक्के, 12 टक्के, 18 टक्के आणि 28 टक्के. तर आता केंद्र आणि राज्य सरकारे उत्पादन शुल्काच्या नावावर 100 टक्के जास्त टॅक्स वसूल करत आहेत.

 

Also Read This : 

टाचांच्या भेगांनी त्रस्त आहात तर मग ‘या’ टिप्स फोलो करा; जाणून घ्या

‘तुझ्यात जीव रंगला’ फेम माधुरी पवारच्या डान्सने चाहते घायाळ !

Paytm : तुम्हाला देखील कॅशबॅक ऑफरचा मेसेज आलाय तर व्हा सावध अन्यथा…

माझ्यामुळं सत्ता गेल्याचं फडणवीसांना दु:ख; संजय राऊतांचा माजी मुख्यमंत्र्यांना टोला

रक्षा खडसेंचा मोठा खुलासा ! म्हणाल्या – ‘एकनाथ खडसे-देवेंद्र फडणवीस यांच्यात बोलणं झालं’

मुंबई HC ची ठाकरे सरकारला सूचना, म्हणाले – ‘अदर पुनावालांना देशात सुरक्षित वाटत नसेल तर तुम्ही त्यांना आश्वस्थ करा’