Petrol Diesel CNG Price In Pune | सलग 9 दिवसांच्या दरवाढीनंतर नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी दिलासा ! सीएनजीच्या किंमतीतही घट

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Petrol Diesel CNG Price In Pune | गेले ९ दिवस पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत ८३ ते ८४ पैशांनी वाढ होत होती (Petrol Diesel Price Hike). नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी तेल कंपन्यांनी तात्पुरता दिलासा दिला आहे. आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. पुणे शहरात आज पेट्रोल ११६.२० रुपये लिटर, पॉवर पेट्रोल १२०.७० रुपये लिटर आणि डिझेल ९८.९४ रुपये लिटर इतका दर आहे. राज्य शासनाने सीएनजी करात कपात करण्याची घोषणा २ दिवसांपूर्वी केली होती. (Petrol Diesel CNG Price In Pune)

 

त्यामुळे शहरातील सार्वजनिक वाहतूक, रिक्षाचालकांना दिलासा मिळणार होता. मात्र, शासनाने सीएनजीच्या करात कपात केल्याचे दिसून आल्यानंतर गुरुवारी कंपन्यांनी अचानक सीएनजीच्या दरात अडीच रुपयांनी वाढ केली.

 

त्यामुळे ८ रुपयांनी सीएनजी दर कमी होण्याऐवजी ते ६ रुपये ३० पैशांनी कमी झाले.
पुण्यात आज सीएनजीचा दर ६२.२० रुपये झाला आहे.

 

Web Title :- Petrol Diesel CNG Price In Pune | Relief on the first day of the new financial year after 9 consecutive days of price hike CNG prices also fall

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा