Petrol Price Today : पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त; जाणून घ्या दर…

नवी दिल्ली : वृत्त संस्था – पेट्रोल-डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना याचा मोठा फटका बसला आहे. पण सध्या तेल कंपन्यांकडून दिलासा मिळणार आहे. आजही सरकारी तेल कंपन्यांकडून पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणतेही बदल करण्यात आले नाहीत. त्यामुळे आज राजधानी दिल्लीत पेट्रोल 90.56 रुपये प्रतिलिटर तर डिझेल 80.87 रुपये प्रतिलिटरवर आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर स्वस्त झाले आहेत. तसेच भारतीय रिफायनरी कंपन्या इराणकडून क्रूड ऑईल आयात करण्याची तयारी सुरु करत आहे. इराणकडून तेल आले तर भारतीय बाजारात पेट्रोल-डिझेलचे दर कपात होऊ शकते, असा अंदाज आहे. मार्च महिन्यात पेट्रोल-डिझेलतच्या किमतीत तीनवेळा कपात झाली होती. या दर कपातीनंतर पेट्रोल 61 पैसे आणि डिझेल 60 पैसे प्रति लिटर स्वस्त झाले. तर फेब्रुवारी महिन्यात पेट्रोलचे दरात 16 टप्प्यात वाढ झाली होती. त्यावेळी पेट्रोल 4.74 रुपयांनी महागले होते.

दिल्लीत पेट्रोल 90.56 रुपये / डिझेल 80.87 रुपये, मुंबईत 96.98 रुपये / डिझेल 87.96 रुपये, कोलकातामध्ये 90.77 रुपये / डिझेल 83.75 रुपये तर चेन्नईमध्ये 92.58 रुपये प्रतिलिटर पेट्रोल झाले आहे. तर डिझेल 85.88 रुपये प्रतिलिटरवर पोहोचले आहे. असे असले तरी येत्या काही दिवसांत पेट्रोल-डिझेलचे दर आणखी कमी होऊ शकतात, असा अंदाज आहे.