Petrol-Diesel Price Today : पेट्रोल-डिझेल पुन्हा महागलं, जाणून घ्या आजचे दर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – पेट्रोल आणि डिझेलच्या भावात वाढ होण्याचे सत्र थांबता थांबत नाही. तेल कंपन्यांनी मंगळवारी (दि. 23) पुन्हा एकदा इंधनाचे दर वाढवले आहेत. रविवारी आणि सोमवारी किंमती थोड्या स्थिरावल्याने ग्राहकांना दिलासा होता. मात्र, आज पुन्हा इंधन दरवाढ झाली आहे. राजधानी दिल्लीत मंगळवारी पेट्रोल आणि डिझेलमध्ये प्रति लिटर 35 पैशांनी वाढ झाली आहे. आज दिल्लीत पेट्रोलची किंमत 90.93 वर पोहोचली आहे. मुंबईतील पेट्रोलची किंमत 97.34 रुपये आहे. एकंदरीतच मेट्रो शहरांमध्ये इंधनाचे दर सर्वाधिक आहे. दिल्ली आणि मुंबईमध्ये पेट्रोलची किंमत आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीवर गेली आहे.

अगोदरच कोरोना संकटातून जातांना सर्वसामान्यांना आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. अशातच गेल्या 12 दिवसांपासून पेट्रोल, डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. अनेक शहरामध्ये पेट्रोलने शंभरीपार केली आहे. राजस्थानमधील श्रीगंगानगर, हनुमागड ते मध्यप्रदेशातील अनेक शहरांमध्ये किरकोळ पेट्रोलचे दर प्रति लिटर 100 रुपयांच्यावर गेले आहेत. इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार, मंगळवारी कोलकातामध्ये पेट्रोलचे दर 91.12 रुपये प्रति लिटर आहेत. तर डिझेलची 84.20 रुपये प्रति लिटर दराने विक्री केली जात आहे. मुंबईत डिझेलचे दर 88.44 रुपये प्रति लिटर आहे.

प्रमुख शहरांमधील पेट्रोल आणि डिझेलचे दर
वाढत्या इंधन दरवाढीमुळे नवी दिल्लीमध्ये पेट्रोलचा भाव प्रति लीटर 90.93 रुपये इतका झाला आहे. तर डिझेलसाठी 81.32 रुपये प्रति लीटर मोजावे लागत आहेत. मुंबईत पेट्रोलचा भाव 97.34 रुपये असून डिझेलसाठी 88.44 रुपये प्रति लीटर द्यावे लागत आहेत. तर कोलकातामध्ये पेट्रोलसाठी 91.1 2 रुपये मोजावे लागत आहे. तर डिझेलचा भाव 84.20 रुपये प्रति लीटर आहे. चेन्नईमध्ये 92. 90 रुपये लीटर पेेट्रोल मिळत आहे. तर डिझेलसाठी 86.31 रुपये लीटर मोजावे लागत आहे. नोएडामध्ये पेट्रोल 89.19 रुपये लीटर मिळत आहे. तर डिझेलचा भाव 81.76 रुपये आहे.