Petrol Diesel Price Today | आजचे पेट्रोल-डिझेलचे दर काय?; जाणून घ्या मुख्य शहरातील दर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Petrol Diesel Price Today | देशात महागाईचा भडका उडत असताना इंधनाचे दरही गगनाला पोहचले आहेत. त्यामुळे नागरिकांना अधिक पैसे मोजावे लागतात. आज पेट्रोल-डिझेलच्या दरात (Petrol Diesel Price Today) कोणताही बदल झाला नाही. भारतीय तेल कंपन्यांनी (Indian oil Companies) पेट्रोल-डिझेलच्या किंमती जारी केल्या आहेत. आज मात्र पेट्रोल-डिझेलचे दर ‘जैसे थे’ आहेत. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market) कच्च्या तेलाच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे देशात पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचं सत्र सुरु होण्याची शक्यता आहे.

 

भारतात आपल्या गरजेच्या 85 टक्के तेल आयात केले जाते आणि त्यामुळे किरकोळ इंधनाचे दर Import Parity Rates वरुन ठरवल्या जातात. दरम्यान, आजही देशातील सर्वात महाग पेट्रोल महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यात (Parbhani) मिळत आहे. येथे 123.47 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. तर, आंध्र प्रदेशच्या (Andhra Pradesh) चित्तूरमध्ये डिझेल 107.68 रुपये प्रति लिटर आहे, तसेच सगळ्यात स्वस्त पेट्रोल पोर्ट ब्लेअरमध्ये 91.45 रुपये आणि डिझेल 85.83 रुपये लिटर आहे.

 

पेट्रोल-डिझेलचे दर कसे पाहाल –

इंडियन ऑईलचे (Indian Oil ONE Mobile App) ॲप तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता. तसेच, पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारेृही कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर SMS करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल.

 

पेट्रोल-डिझेलचे दर –

 

दिल्ली –

पेट्रोलचा दर – 105.41 रुपये
डिझेलचा दर – 96.67 रुपये

 

मुंबई –

पेट्रोलचा दर – 120.51 रुपये
डिझेलचा दर – 104.77 रुपये

 

Web Title :- Petrol Diesel Price Today | petrol diesel price today 21 may 2022 know latest rate petrol diesel rate not changed today know latest rate of your city iocl fuel rates crude oil

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा