MLA Ram Satpute | भाजप आमदाराच्या कारचा अपघात, गाडीचे 3 टायर फुटले; राम सातपुते सुखरूप

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपचे माळशिरसचे आमदार राम सातपुते (MLA Ram Satpute) यांच्या गाडीला अपघात झाला आहे. टेंभुर्णी येथील भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या सभेला जाताना हा अपघात (Accident) झाला आहे. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झालेली नसून आमदार राम सातपूते (MLA Ram Satpute) आणि त्यांचे सहकारी सुखरुप आहेत. अपघात झाल्याची माहिती सातपुते यांनी फेसबुकवर व्हिडिओ शेअर करुन दिली. राम सातपुते यांनी सांगितले की, मी सुखरुप आहे, मला कसल्याही प्रकारची इजा झालेली नाही. आतापर्यंत केलेलं काम आणि लोकांचे आशीर्वादामुळे मी थोडक्यात बचावलो, अशी प्रतिक्रिया अपघातानंतर त्यांनी दिली.

 

राम सातपुते (MLA Ram Satpute) हे भाजपचे युवा आणि धडाडीचे आमदार आहेत. आपल्या पक्षाची रोखठोक आणि आक्रमक पद्धतीने बाजू मांडण्यासाठी त्यांची राज्यभरात ओळख आहे. विरोधी पक्षनते देवेंद्र फडणवीस यांचे निवकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख आहे. टेंभूर्णी येथे फडणवीस यांच्या सभेसाठी निघाले होते. त्यावेळी पुणे-पंढरपूर मार्गावरील (Pune-Pandharpur Road) वेळापूर या ठिकाणी अचानक ट्रॅक्टर आडवा आल्याने त्यांच्या गाडीचा अपघात झाला.

 

 

अपघातानंतर राम सातपुते यांनी व्हिडिओ जारी करत म्हटले की, मतदारसंघातील प्रवासादरम्यान माझा अपघात झाला. यामध्ये गाडीचे तीन टायर फुटले (Tires Burst). मात्र जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने, आजपर्यंत माझ्या हातून जे काही पुण्य घडलं तसेच पांडुरंगाच्या कृपेने मी या अपघातातून सुखरूप बचावलो. तालुक्यातील जनतेच्या आशिर्वादाने माझ्या केसालाही धक्का लागला नाही. मला आणि माझ्या सोबत असणाऱ्या माझ्या सहकाऱ्यांना कुठल्याही प्रकराची इजा अथवा काहीही दुर्घटना घडलेली नाही.

 

Web Title :- MLA Ram Satpute | solapur malshiras bjp mla ram satpute car accident news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा