पेट्रोल 5 रुपयांनी स्वस्त होणार ? जाणून घ्या, आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गेल्या काही महिन्यांपासून देशातील तेल कंपन्यांनी इंधन दरवाढीचा सपाटा लावला होता. त्यामुळे सर्वसामान्य वाहनचालक त्रस्त झाले होते. मात्र आता तेल कंपन्यांनी जवळपास एक महिन्यांनी इंधनाच्या किंमतींबाबत आढावा घ्यायला सुरुवात केली आहे. गुरुवारी पेट्रोलच्या किंमतीत (Petrol Price) 23 पैसे तर डिझेलच्या किंमतीत 26 पैशांनी वाढ झाली आहे. तर शुक्रवारी (दि. 8) इंधनाच्या दरात कोणतेही बदल झाले नाही आहेत. यामुळे रेकार्डस्तरावर पोहचलेल्या इंधनाच्या किंमतीपासून सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळू शकतो असे बोलले जात आहे. कोरोना संकट काळात पेट्रोल-डिझेलवर वाढवलेल्या उत्पादन शुल्कात 50 टक्क्याने कपात केली तर पेट्रोलचे दर 5 रुपयांपर्यंत प्रति लीटरमागे कमी होऊ शकतात.

इंडियन ऑयल कॉरपोरेशन लिमिटेड (IOCL), भारत पेट्रोलियम कॉरपोरेशन लिमिटेड (BPCL) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉरपोरेशन लिमिटेड (HPCL) या तेलकंपन्या किंमतीबाबत आढावा घेत आहे. पेट्रोलियम मंत्रालयाने उच्चांकी पेट्रोल-डिझेलच्या दरात दिलासा देण्याची शिफारस केली आहे. उत्पादन शुल्क कमी करून सामान्यांना दिलासा दिला जाऊ शकतो, असे मंत्रालयाने असे म्हटले आहे. कोरोना संकट काळात पेट्रोल-डिझेलवर वाढवलेल्या उत्पादन शुल्कात 50 टक्क्याने कपात केली तर पेट्रोलचे दर 5 रुपयांपर्यंत प्रति लीटरमागे कमी होऊ शकतात. लॉकडाऊन काळात सरकारने पेट्रोलवर एकरकमी 10 रुपये उत्पादन शुल्क वाढविले होते. तसेच, उत्पादन शुल्कात कपात केली गेली तर ग्राहकांना याचा लाभ मिळवून देण्यासाठी राज्यांना देखील सहकार्य करावे लागेल, असेही मंत्रालयाने म्हटले आहे.

देशातील विविध शहरांतील पेट्रोल-डिझेलचे आजचे दर
शहर        पेट्रोल             डिझेल
– दिल्ली – 84.20 रुपये लीटर 74.38 रुपये लीटर
– मुंबई – 90.83 रु. 81.07 रु.
– कोलकाता – 85.68 रु. 77.97 रु.
– चेन्नई – 86.96 रु. 79.72 रु.
– बंगळुरु – 87.04 रु. 78.87 रु.
– नोएडा- 84.06 रु. 74.82
– गुरुग्राम- 82.39 रु. 74.97 रु.
– लखनऊ – 83.98 रु. 74.74 रु
– पाटणा- 86.75 रु. 79.51रु.

कसे जाणून घ्याल, पेट्रोल-डिझेलचे नवे दर.
देशातील HPCL, BPCL आणि IOC या तीन तेल विपणन कंपन्या सकाळी 6 नंतर पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जारी करतात. तसेच, पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दरांसाठी आपण वेबसाइटला भेट देऊन माहिती मिळवू शकता. याशिवाय, पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर तुम्ही मोबाइल फोनवर SMS द्वारे तपासू शकता. यासाठी तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल माहिती जाणून घेऊ शकता. तुम्हाला RSP<स्पेस>पेट्रोल पंप डीलरचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल.