आता कमी पेट्रोल-डिझेल दिल्यावर पेट्रोल पंपाचा रद्द होऊ शकतो परवाना, ‘इथं’ करू शकता तक्रार

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : पेट्रोल पंप ऑपरेटरची जास्त वसुली किंवा कमी पेट्रोल आणि डिझेलची विक्री आता तोट्याचा सौदा होऊ शकतो. ग्राहकाने याबाबत ग्राहक मंचामध्ये तक्रार केल्यास पेट्रोल पंपचा परवाना कायमचा रद्द केला जाऊ शकतो. सध्या ग्राहकांच्या तक्रारीवरून जिल्हा पुरवठा विभाग पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीवर काही दिवस बंदी घालते किंवा नाममात्र दंड आकारला जातो, पण आता देशात नवीन ग्राहक संरक्षण कायदा लागू झाल्यानंतर पेट्रोल पंप चालकावर भरमसाठ दंड देऊनही मोठी कारवाई शक्य आहे. नवीन वर्षात या कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची कवायत वेगाने सुरु झाली आहे. पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाने तेल कंपन्यांना याबाबत कडक सूचना जारी केल्या आहेत.

अशा प्रकारे रद्द होऊ शकतो पेट्रोल पंप परवाना !
पेट्रोल पंपांवर मशीनमध्ये चिप लावून पेट्रोल आणि डिझेल कमी करण्याच्या प्रकरणात मोदी सरकारने गेल्या वर्षी कठोर पावले उचलली होती. देशातील पेट्रोल पंपांवर आता चिप लावून ऑईलची चोरी ऑपरेटर्सवर भारी पडणार आहे. मागील वर्षी 20 जुलै रोजी नवीन ग्राहक संरक्षण कायदा 2019 लागू झाल्यानंतर आता पेट्रोल पंप चालकांवर कडक कारवाई सुरू झाली आहे. कमी पेट्रोल आणि डिझेलच्या तक्रारीमुळे ग्राहक त्रस्त आहेत, परंतु पेट्रोल पंप ऑपरेटर नवीन ग्राहक संरक्षण कायदा 2019 अंतर्गत ग्राहकांची फसवणूक करू शकत नाहीत. आता पेट्रोल पंपवर मानकांनुसार पेट्रोल किंवा डिझेल उपलब्ध होईल. ग्राहकाने तक्रार केल्यास पेट्रोल पंपावर दंडासह परवाना रद्दही होऊ शकतो.

शहरांपासून खेड्यापाड्यात पसरला तेल चोरीचा खेळ
देशातील तेल चोरीचा खेळ छोट्या शहरांपासून मोठ्या शहरांत आणि खेड्यांमध्ये पसरला आहे. पेट्रोल पंप मालक अनेक प्रकारे ग्राहकांची फसवणूक करतात. सामान्य लोक अनेकदा पेट्रोल-डिझेल लिटरमध्ये नाही तर रुपयांमध्ये भरतात. जसे कि, 100 रुपये , 500 किंवा 2000 हजारचे. ग्राहकांना हे ठाऊक नसते की, या फिक्स रुपयांवर आधीपासूनच पेट्रोल पंप ऑपरेटरने चिप कावून लिटर कमी केलेले असते. यामुळे ग्राहकांची फसवणूक होते.

या कायद्याद्वारे केली जाणार कारवाई
नवीन ग्राहक संरक्षण कायदा अधिनियम 2019 नुसार भेसळयुक्त किंवा बनावट उत्पादनांच्या निर्मितीसाठी किंवा विक्रीसाठी कठोर नियम निश्चित केले गेले आहेत. आता ग्राहकांने कमी तेल मिळाल्याबद्दल तक्रार केल्यास सक्षम कोर्टाने ग्राहक कायद्यात तरतूद केली आहे. प्रथमच कोर्टात दोषी ठरल्यास पेट्रोल पंप मालकाचा परवाना दोन वर्षापर्यंत निलंबित केला जाऊ शकतो. दुसर्‍या किंवा नंतरही पेट्रोल पंप मालकाविरूद्ध तक्रार आल्यास परवाना कायमस्वरूपी रद्द केला जाऊ शकतो. त्याचबरोबर देशात नवीन ग्राहक कायदा लागू झाल्यानंतर पेट्रोल पंपवर एसडीएम, माप-वजन विभाग आणि पुरवठा विभागाची मिलीभगत चालणार नाही. यापूर्वी पेट्रोल पंपाची मिलीभगतमुळे कोणतीही ठोस कारवाई होत नव्हती, परंतु आता नवीन ग्राहक संरक्षण कायदा लागू झाल्यामुळे ग्राहकांना अनेक अधिकार मिळाले आहेत.