PF Account मधून तुम्ही अद्यापही काढू शकता ‘अॅडव्हान्स’, जाणून घ्या प्रक्रिया
नवी दिल्ली, वृत्तसंस्था : कोरोना विषाणूच्या साथीनंतर लगेचच केंद्र सरकारने कर्मचार्यांना कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF – Employee Provident Fund) तून आगाऊ रक्कम काढण्याची परवानगी दिली होती. तथापि, सरकारने काही कालावधीसाठी ही सूट दिली होती कारण लॉकडाऊन आणि पैशांच्या अभावामुळे लोकांना त्रास होऊ नये. केंद्र सरकारने नियम शिथिल केल्यानंतर ईपीएफओच्या कक्षेत आलेल्या कर्मचार्यांनी याचा लाभ देखील घेतला.
44 हजार कोटींपेक्षा जास्त रक्कम काढण्यात आली
ईपीएफओने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार असे समोर येते की मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतून 38,71,664 लोकांनी 44,054.72 कोटी रुपये काढले आहेत. कामगार मंत्री संतोष गंगवार यांनी सांगितले की या विड्रॉल मध्ये कोविड-19 संबंधित दाव्यांचा देखील समावेश आहे. महाराष्ट्रातूनच 25 मार्च ते 31 ऑगस्ट या कालावधीत 7,23,986 कर्मचार्यांनी सुमारे 8,968.45 कोटी रुपये काढले आहेत.
आता 1 सप्टेंबरनंतर पीएफ खात्यातून आगाऊ रक्कम काढण्यासाठी सरकारने दिलेली सूट कालबाह्य झाली आहे. अशा परिस्थितीत आपण या योजनेंतर्गत पीएफ खात्यातून पैसे काढू शकत नाही. तथापि, कर्मचार्यांना अद्याप त्यांच्या पीएफ खात्यातून पैसे काढण्याचा पर्याय आहे. परंतु हे सरकारद्वारे आगाऊ पैसे काढण्याच्या योजनेंतर्गत नसणार आहे. आता पीएफ खात्यातून पैसे काढण्याची प्रक्रिया काय आहे ते जाणून घेऊया…
1. कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतून पैसे काढण्यासाठी प्रथम तुम्हाला ईपीएफओच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन लॉगिन करावे लागेल. आपण आपल्या यूएएन (UAN) आणि संकेतशब्दाच्या मदतीने लॉग इन करू शकता. लक्षात ठेवा की आपले पीएफ खाते आधारशी जोडलेले असावे.
2. या पोर्टलवर लॉगिन केल्यानंतर Online Service वर क्लिक करा आणि Claim (Form-31, 19 & 10C) ला निवडा.
3. पुढील स्टेपमध्ये आपल्याला बँक खाते क्रमांक प्रविष्ट करून Verify वर क्लिक करावे लागेल. यानंतर पुन्हा Yes वर क्लिक करा. आता Proceed For Online Claim वर जा.
4. ऑनलाइन पैसे काढण्यासाठी PF Advance (Form 31) निवडा. आता आपल्याला येथे हे सांगावे लागेल की आपण ही रक्कम का काढत आहात. कारण सांगितल्यानंतर आणि कर्मचार्याचा पत्ता भरल्यानंतर अर्ज करा.
5. पैसे काढण्याच्या कारणाशी संबंधित कागदपत्रांची स्कॅन कॉपी तुम्हाला सादर करावी लागेल. ईपीएफ खात्यातून पैसे काढण्यासाठी तुम्हाला तुमच्या नियोक्ता/ कंपनीकडून मान्यता देखील घ्यावी लागेल.
6. यानंतर तुमचे पैसे बँक खात्यात जमा होतील. आपल्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर याविषयी एक मॅसेज येईल. बँक खात्यात पैसे हस्तांतरित करण्यासाठी एक निश्चित कालावधी लागतो.