PF Balance | इंटरनेट आणि मोबाइल डेटा न वापरता चुटकीत जाणुन घ्या आपला PF बॅलन्स, अतिशय सोपी आहे ‘ही’ पद्धत
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मोदी सरकार (Modi Government) ने तुमच्या PF खात्यात (PF account) किती पैसे ट्रान्सफर (PF transfer) केले आहेत हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला आता इंटरनेट किंवा मोबाइल डेटाची (Internet Or Mobile Data) आवश्यकता नाही. हे काम तुम्ही विना इंटरनेट सुद्धा करू शकता. केवळ मोबाइलवरून एक मिस्ड कॉल किंवा एसएमएस करून तुम्ही बॅलन्स (PF Balance) जाणून घेवू शकता.
विना इंटरनेट जाणून घेऊ शकता PF बॅलन्स
1- SMS द्वारे जाणून घ्या बॅलन्स
एसएमएसने सुद्धा आपला पीएफ अकाऊंटचा बॅलन्स सहज जाणून घेवू शकता.
यासाठी तुम्हाला तुमचा युएएन माहित असायला हवा.
सोबतच तो अॅक्टिव्ह असावा. एसएमएस सर्वप्रथम EPFOHO UAN HIN टाइप करून 7738299899 वर पाठवावा लागेल.
ज्यानंतर तुम्हाला हिंदीमध्ये मॅसेज येईल.
ज्यामध्ये तुमच्या पीएफ अकाऊंटमध्ये जमा रक्कमेची पूर्ण माहिती असेल.
2- मिस्ड कॉलद्वारे जाणून घ्या डिटेल्स
पीएफ अकाऊंटचा बॅलन्स एका मिस्ड कॉलने जाणून घेऊ शकता.
यासाठी आपल्या अकाऊंटमध्ये रजिस्टर्ड मोबाइल नंबरवरून 011-22901406 वर एक मिस्ड कॉल द्यावा लागेल.
ज्यानंतर तुम्हाला ईपीएफओकडून एक एसएमएस येईल.
ज्यामध्ये तुम्हाला आपल्या पीएफ अकाऊंटमध्ये जमा रक्कमेची संपूर्ण माहिती मिळेल
ऑनलाइन असा जाणून घेवू शकता बॅलन्स
3- वेबसाईटद्वारे जाणून घ्या बॅलन्स
यासाठी https://passbook.epfindia.gov.in/MemberPassBook/Login वर लॉग-इन करा.
आता युएएन आणि पासवर्ड द्वारे लॉग-इन करा. यानंतर डाऊनलोड व्ह्यू पासबुकच्या ऑपशनवर क्लिक करा.
4- उमंग अॅपद्वारे जाणून घ्या बॅलन्स
प्ले स्टोरवरून उमंग अॅप डाऊनलोड करा. या अॅपवर अनेक सरकारी सेवा उपलब्ध आहेत.
यामध्ये ईपीएफओ ऑपशन निवडल्यानंतर एम्प्लॉई सेंट्रीक सर्व्हीस निवडा. आता युएएन नंबर टाका.
यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी प्राप्त होईल. तुम्ही व्ह्यू पासबूक अंतर्गत ईपीएफ बॅलन्स चेक करू शकता. (PF Balance)
आले आहेत व्याजाचे पैसे
सरकारने अगोदरच आर्थिक वर्ष 2020-21 साठी पीएफवर 8.5 टक्के व्याज ट्रान्सफर करण्याच्या प्रस्तावावर हिरवा झेंडा दाखवला आहे.
लेबर मिनिस्ट्रीने सुद्धा या निर्णयावर आपली सहमती दिली आहे. आता EPFO सबस्क्रायबर्सच्या खात्यात 8.5 टक्के व्याज जमा करत आहे. (PF Balance)
Web Title : PF Balance | you can check pf balance without internet or mobile data check balance via sms missed call
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update