Coronavirus : जगानं ‘कोरोना’शी लढणार्‍या नर्सच्या हिम्मतीचं केलं ‘कौतुक’, थकव्यामुळं शरीर झिझलं पण मानली नाही ‘हार’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जेव्हा कोरोना विषाणूचा प्रसार झाला तेव्हापासूनच चिनी रुग्णालयांमध्ये दक्षता वाढविण्यात आली . तेथील रुग्णालयातील डॉक्टरांनी तब्बल २४-२४ तास काम केले आहे. एवढेच नव्हे तर परिचारिकांनीही कोरोनाचा सामना करण्यासाठी २४ तास काम केली आहेत. आता त्यासंबंधीचे त्यांचे फोटोही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. दरम्यान चीननंतर इटलीला सर्वात जास्त कोरोना विषाणूची प्रकरणे समोर आली आहेत. येथे देखील डॉक्टर आणि परिचारिकांनी कोरोनाच्या रुग्णांची २४ तास काम करून विशेष काळजी घेतली आहे. इतकेच नाही तर इटलीमध्ये कोरोना विषाणूला झुंज देता-देता 1400 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

हा फोटो आला समोर
हा फोटो अँड्रिया व्होग्ट यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. यामध्ये एक परिचारिका तोंडावर मास्क घालून झोपलेली दिसत आहे. कारण ती खूप थकली आहे. हा फोटो नर्स एलीन पेग्लियारिनीचा आहे आणि ती लोम्बार्डी भागातील एका रूग्णालयात काम करते. हा फोटो पाहून तुम्ही इटलीची परिस्थिती चांगलीच समजू शकाल. कारण तेथील डॉक्टर्सपासून नर्सपर्यंत सर्वांना २४-२४ तास काम करावे लागत आहे.

थकवा आणि तणाव दरम्यान देखील काम
पेग्लियारिनीचा हा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. लोकांनी त्यांना मेसेज देखील केले आहेत. एवढेच नव्हे तर लोकांनी तिची मेहनत पाहून तिला सलामही केला आहे. पेग्लियारिनी म्हणते की मी खरोखर शारीरिकरित्या थकत नाही आणि २४ तास मी सतत काम देखील करू शकते, परंतु मी हे लपवू शकत नाही की सध्या मी अस्वस्थ नाही. कारण या काळात मी एका शत्रूशी लढा देत आहे ज्याला मी ओळखत देखील नाही.

दुसरा फोटो
मिस अलेसिया बोनारीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हा फोटो शेअर केला असून तिच्या चेहऱ्यावर खुणा असल्याचे दिसून आले आहे. या खुणा इतर कोणत्याही गोष्टीमुळे नाहीत तर पूर्ण वेळ काम करत असल्यामुळे मास्क घातल्याने झाल्या आहेत.

अलेसिया बोनारीने लिहिले आहे की मास्क तिच्या चेहर्‍यावर फिट बसत नाही. त्यांचे डोळेही नीट झाकले जात नाहीत. त्यांनी सांगितले आहे की रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना ६-६ तास पाणी पिण्यास देखील मिळत नाही आणि त्यांना शौचालयात न जाताच काम करावे लागते.

दोन आठवड्यांपासून मुलाची भेट झाली नाही
लोम्बार्डीतील अजून एक शहर बार्गेमच्या रुग्णालयातील डॅनियल मॅकशिनी नावाच्या एका परिचारिकेने एक फेसबुक पोस्ट केली आहे. त्यांनी लिहिले की गेल्या दोन आठवड्यांपासून मी माझ्या मुलाला आणि कुटूंबाला भेटू शकलेले नाही. मला भीती आहे की त्यांनाही कोरोना विषाणूची लागण होईल. माझ्याकडे माझ्या मुलाची काही छायाचित्रे आणि व्हिडिओ आहेत, ज्यांना पाहून माझे अश्रू अनावर होतात.

एवढेच नाही तर तासनतास काम करणारे आरोग्य कर्मचारीही तणावातून जात आहेत. मानसिक ताणतणाव दूर करण्यासाठी अनेक रुग्णालयांमध्ये मानसोपचार तज्ज्ञांशीही कर्मचार्‍यांची ओळख करून दिली जात आहे. गेल्या आठवड्यात बार्गेममधील ५० डॉक्टरांना कोरोना विषाणूची लागण झाली.