PIB Fact Check : तुमच्याकडे सुद्धा ही 500 रुपयाची नोट आहे का? RBI नं दिली महत्वाची माहिती, तात्काळ जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्त संस्था – PIB Fact Check | सध्या सोशल मीडियावर (Social Media Platform) 500 रुपयांच्या नोटेबाबत एक बातमी खुपच वायरल (Viral message on social media) होत आहे. ज्यामध्ये दावा केला आहे की, 500 रुपयांची ती नोट घेऊ नये जिच्यावर हिरवी पट्टी आरबीआय गव्हर्नर (RBI Governor) च्या सहीजवळ नसून गांधींजीच्या छायाचित्राजवळ असते.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

जाणून घ्या काय आहे सत्य?
तपास केला असता पीआयबी फेक्ट चेक (PIB Fact Check) मध्ये ही बातमी बनावट निघाली. आरबीआयनुसार, दोन्ही प्रकारच्या नोटे कोणताही बदल नाही आणि दोन्ही नोटा मान्य आहेत. पीआयबी फॅक्ट चेक(PIB Fact Check)ने हा दावा खोटा असल्याचे म्हटले आहे. यासाठी जर तुमच्याकडे 500 रुपयांची ही नोट असेल, जसे वर सांगितले आहे, तर घाबरण्याचे कारण नाही. पीआयबी वेळोवेळी सोशल मीडियावर वायरल होणार्‍या बनावट बातम्यांबाबत माहिती देत असते. ज्यामुळे लोकांना नुकसानीपासून वाचवता येते.

5,10 आणि 100 च्या जुन्या नोटा होणार बंद
यापूर्वी सुद्धा सोशल मीडियावर दावा करण्यात आला होता की 5, 10 आणि 100 च्या जुन्या नोटा बंद होणार आहेत. यानंतर प्रेस इन्फॉर्मेशन ब्यूरो (Press Information Bureau) कडून एक ट्विट करण्यात आले. ज्यामध्ये म्हटले होते वरील मेसेज बनावट आहे. या नोटा चलनात राहणार आहेत.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Web Title : pib fact check these 500 rupees currency notes are not fake know about it

हे देखील वाचा

Covid-19 Vaccine | भारताने मोडला लसीकरणाचा आपलाच विक्रम, एका आठवड्यात दिल्या सुमारे 4 कोटी व्हॅक्सीन

Delta Plus Variant | ‘डेल्टा प्लस’ व्हेरिएंटमुळे पुन्हा निर्बंध ! मुंबईसह 33 जिल्ह्यात स्तर 3 चे नियम; एक, दोन स्तरामुळे मिळणारी सवलत रद्द

पहा व्हिडिओ